श्री शंभू महादेव मंदिर, शिखर शिंगणापूर
काशी विश्वेश्वर, माहुली
मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात असून, मंदिर हेमाडपंथी आहे.
मंदिराभोवती संरक्षक बुरूज आहेत.यवतेश्वर मंदिर (सातारा)
शंकर आणि भैरवनाथाचे प्राचीन मंदिर आहे. दीपावली अमावस्येला तेथे यात्रा भरते.
छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेले हे यवतेश्वर महादेवाचे हे मंदिर आहे.कोटेश्वर मंदिर, लिंब-गोवे
पेशवेकालीन बांधकाम. नारो अप्पा तुळशीबागवाले यांनी काही बांधकाम केले. त्यानंतर सांगलीच्या धनी वेलणकर यांनी बांधकाम केले.श्री तीर्थक्षेत्र नागनाथवाडी (ललगुण, ता. खटाव)
मंदिरातील पाषाणरुपी शिवलिंग स्वयंभू असून ते जमिनीपासून ३१ फूट खोल पाण्यात आहे.
शिवलिंगातून अखंड पाण्याचा झरा वाहतो.
जब्रेश्वर मंदिर, फलटण
यादवकालीन हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर एक मीटर उंचीच्या पीठावर उत्तराभिमुख आहे.
१२ व्या शतकात मंदिर बांधल्याची माहिती आहे.श्री पावकेश्वर मंदिर, सैदापूर (कऱ्हाड)
१३ व्या शतकातील बांधकाम असून दुर्मिळ शिल्पकलेची बांधणी आहे.पांडवकालीन शिवमंदिर, परळी (सातारा)
उरमोडी धरणाच्या भिंतीलगत हेमाडपंथी मंदिर आहे.
मंदिर पांडवकालीन असल्याचे बोलले जाते.भीमाशंकर मंदिर, गोंदवले बुद्रुक
भीमाशंकर येथील पिंडीसारखी मंदिरात पिंड आहे.श्री क्षेत्र हरेश्वर मंदिर (सोळशी, ता. कोरेगाव)
गावातील १६ शिवलिंगांपैकी डोंगरावरील मुख्य शिवलिंग आहे.कोटेश्वर मंदिर, (सातारा)
शहरात शुक्रवार पेठेत पूर्ण दगडाचे उंच शिखर असलेले मंदिर.श्री क्षेत्र मेरुलिंग मंदिर, (नरबदेव, ता. जावळी)
अत्यंत रचनात्मक पद्धतीने बांधलेल्या नवसाला पावणाऱ्या स्वयंभू शंभू महादेवाचे स्थान.कोयनेश्वर मंदिर, कऱ्हाड
कोयना काठावर श्री कोयनेश्र्वर मंदिर.श्री शंभू महादेव मंदिर (सदाशिवगड, ता.कऱ्हाड)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक किल्ला.
गडावर सुमारे १०० वर्षे अधिक काळ जुने मंदिर.मरडेश्वर मंदिर (मरडमुरे, ता. जावळी)
मरडेश्वराच्या टेकडीवरून सातारा शहर, अजिंक्यताऱ्यासह निसर्गसौंदर्याचे दर्शन.काळेश्वर मंदिर, केळघर
काळेश्वर मंदिर पुरातन व पांडवकालीन आहे.ओम संगमेश्वर महादेव मंदिर, भाडळी खुर्द
मंदिर ११० वर्षांपूर्वीच आहे.
भाडळी खुर्द व भाडळी बुद्रुक या गावांच्या दोन्ही ओढ्यांच्या संगमावर मंदिर, त्यामुळे संगमेश्वर मंदिर म्हणतात.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.