प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने Shreya Ghoshal २२ मे रोजी मुलाला जन्म दिला. श्रेयाचा मुलगा सहा महिन्यांचा झाला असून त्यानिमित्त तिने सोशल मीडियावर मुलासोबतचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
देव्यान असं श्रेयाच्या मुलाचं नाव आहे. 'हॅलो, मी देव्यान आहे आणि आज मी सहा महिन्यांचा झालो. सध्या मी माझ्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींचं निरीक्षण करतोय, माझी आवडती गाणी ऐकतोय, विविध फोटो असलेली पुस्तकं वाचतोय, विनोदांवर मनमोकळं हसतोय आणि माझ्या आईसोबत संवाद साधतोय. ती मला ओळखते. तुम्ही दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादासाठी तुमचे आभार', असं कॅप्शन देत श्रेयाने हे फोटो पोस्ट केले आहेत. Instagramया फोटोंमधील देव्यानच्या हावभावांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रेया आणि देव्यानच्या या फोटोंवर मिथिला पालकर, मंदिरा बेदी, सोफी चौधरी, समीरा रेड्डी, सुनिधी चौहान, सलीम मर्चंट, शक्ती मोहन यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. श्रेयाने २०१५ मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्नगाठ बांधली होती. नवी दिल्लीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.