Sid Kiara Wedding Expense esakal
फोटोग्राफी

Sid Kiara Wedding Expense : शेरशाहचं लग्न खर्चाला नाय तोटा! चक्क इतक्या कोटींची उधळण

नुकतंच काल सिद्धार्थ आणि कियाराचं शाही लग्न पार पडलं

साक्षी राऊत

Sid Kiara Wedding Expense : नुकतंच काल सिद्धार्थ आणि कियाराचं शाही लग्न पार पडलं. त्यांचं लग्न ठरल्यापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. रोझ डे च्या दिवशी हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. त्यांच्या लग्नाचा व्हेन्यूदेखील शाही होता. हॉलीवूड ते बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांच्या पसंतीचं ठिकाण सूर्यगढ पॅलेस येथे या जोडप्याचं लग्न त्यांच्या नातलगांच्या आणि मित्रमंडळींच्या साक्षीनं पार पडलं. त्यांच्या लग्नाचा खर्च ऐकून तुम्ही चकीत व्हाल.

बॉलीवूडमधील शाही आणि खर्चिक लग्नसोहळ्यांच्या यादीत आता सीड कियाराच्या लग्नसोहळ्याची भर पडली आहे. तेव्हा त्यांच्या शाही लग्नात एकूण किती खर्च झाला ते आपण जाणून घेऊया.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, या पॅलेसमध्ये एका दिवसाच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च येऊ शकतो आणि पीक टुरिस्ट सीझनमध्ये तो 2 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी या पॅलेसची बुकींग तीन दिवसांकरिता करण्यात आली होती. तेव्हा एका दिवसाच्या हिशोबाने या पॅलेसचा तीन दिवसांचा खर्च जवळपास 6 कोटी रुपये एवढा असल्याचा अंदाज वर्तवल्या गेलाय. सीड कियाराचं लग्न हे बॉलीवूडच्या महागड्या लग्नांपैकी एक आहे.
कियाराच्या शाही दागिन्यांची किंमतही कोट्यावधींत आहे. सिद्धार्थने लग्नात घातलेली डिझायनर शेरवानीची सुद्धा किंमत फार आहे. कुणाल रावल या फॅशन डिझायनरकडून त्याने ही शेरवानी डिझाईन करून घेतलीय.
त्यांच्या लग्नात अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT