sonalee kulkarni shared post about she not celebrate ganeshotsav this year because her grandmother passed away  sakal
फोटोग्राफी

Photo: यंदा पहिल्यांदाच आम्ही गणपती बसवला नाही.. सोनालीची भावनिक पोस्ट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडल्याने यंदा त्यांच्याकडे बाप्पा विराजमान झाले नाही. म्हणून सोनालीने काही आठवणी शेअर केल्या आहेत.

नीलेश अडसूळ

Ganeshotsav 2022 : सध्या आपल्याकडे संबंध वातावरण चैतन्यमय झालं आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. प्रत्येकजण आपल्या घरातील सजावट, गणेशाची मूर्ती. आरास याचे फोटो शेअर करत आहेत. यामध्ये कलाकारही मागे नाहीत. तेही आपल्या गणेशोत्सवाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहेत. यामध्ये लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पोस्टने. कारण तिच्या घरी यंदा गणपती आले नाही. त्यामागे एक दुःखद कारणही आहे. तिची आजीचे निधन झाल्याने यंदा त्यांच्याकडे गणपती नाहीत. त्यामुळे जुन्या आठवणींचे काही फोटो शेअर करत सोनालीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (sonalee kulkarni shared post about she not celebrate ganeshotsav this year because her grandmother passed away)

सोनाली कुलकर्णी दरवर्षी अत्यंत जल्लोषात गणेशोत्सव साजरा करते.
केवळ आरासच नाही तर स्वतःच्या हाताने ती गणेशाची मूर्ती घडवते. सोनालीच्या घरचा बाप्पा कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असते.
मात्र यंदा सोनलच्या घरी गणपती बाप्पा आले नाहीत. त्याचे कारण असे की, तिच्या आजीचे यावर्षी निधन झाले आहे.
म्हणून सोनालीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती म्हणते, ' तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. इतक्या वर्षांत आम्ही यंदा पहिल्यादंच गणपती बसवत नाहीयोत. आजी म्हणाली होती, मी गणपती येईस्तोवर थांबते, पण.. निदान त्या शारीरिक वेदनांतून तिची सुटका झाली. ती जिथे कुठे असेल शांत, समाधानी, आनंदी असेल असं वाटतेंय.
पुढे ती म्हणते, 'माझी लाडकी आजी आता माझ्या लाडक्या बाप्पा कडेच गेलीये. प्रिय आजी (आई), पुढच्या वर्षी, तू शिकवलंयस तसा, नेहमीप्रमाणे, तुझ्या मनासारखा गणेशोत्सव साजरा करू.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर अद्याप कारवाई नाहीच; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

Donald Trump : ट्रम्प यांना मोठा झटका! जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आदेशाला न्यायाधीशांची स्थगिती

Wimbledon Women Final: अव्वल मानांकित सबलेंकाला धक्का; अमेरिकेची अमांडा ॲनिसिमोवा अंतिम फेरीत

Satara Crime: 'दोन महिलांना मारहाण करून लुटले'; मॉर्निंग वॉकसाठी जाताना प्रकार, साडेसात तोळे दागिने लंपास

Breakfast Recipe: वीकेंडच्या नाश्त्यासाठी घरी बनवा चविष्ट चीझ गार्लिक ब्रेड, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT