लाळ हा तोंडात तयार होणारा द्रव आहे. लाळ अँटीसेप्टिक म्हणून काम करते. लाळेमध्ये असलेले एन्झाईम अन्न पचनास मदत करतात. लाळ माणसाला अनेक आजारांपासून वाचवण्याचे काम करते. डोळ्यांचे आजार, त्वचेशी संबंधित आजार आणि दातांच्या अनेक समस्यांमध्ये लाळेचा वापर फायदेशीर ठरतो.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
आयुर्वेदातही लाळेचे अनेक फायदे सांगितले आहेत. सकाळची शिळी लाळ अधिक फायदेशीर सिद्ध होते. चला तर मग सकाळच्या शिळ्या लाळेचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.डोळ्यांसाठी: जर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील तर त्यावर शिळी लाळ लावल्याने खूप फायदा होतो. सकाळी तोंडाच्या लाळेने डोळ्याभोवती हळूवारपणे चोळा. काही दिवसात डार्क सर्कल दूर होतील. तसेच सकाळी काजळाप्रमाणे लाळ डोळ्यात लावल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते.पोटाशी संबंधित समस्या: पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी सकाळची शिळी लाळ खूप फायदेशीर आहे. यासाठी सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे तुम्हाला पचनासंबंधी त्रास कधीही होणार नाही.त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर: डाग, पिंपल्स दूर करण्यासाठी सकाळची शिळी लाळ फायदेशीर ठरते, मुरुमांची समस्या असल्यास शिळी लाळ चेहऱ्यावर लावल्याने ही समस्या दूर होते. सकाळची शिळी लाळ पिंपल्स किंवा जखमा बऱ्या झाल्यानंतर जे डाग राहतात ते घालवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.