राजस्थानमधील अत्यंत नयनरम्य ठिकाणी अभिनेता रणबीर कपूरने गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला. राजस्थानमधील जवाई धरण परिसरात सुजान जवाई कॅम्प या ठिकाणी रणबीर-आलियाने एकमेकांसोबत निवांत वेळ घालवला.
या रिसॉर्टच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, येत्या १ ऑक्टोबरपासून ही जागा इतरांसाठी उपलब्ध होणार असून त्यापूर्वी आलिया-रणबीरसाठी इथं विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तंबू आणि सूट्समध्ये राहण्याची व्यवस्था याठिकाणी केली जाते. तंबूप्रमाणे दिसणाऱ्या या रॉक सूटची एका रात्रीची किंमत ही तब्बल ९१ हजार रुपये आहे. कॅम्प पिकनिकचा रोमँटिक फोटो पोस्ट करत आलियाने रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाळवंटातील ड्राइव्ह, रबारी आदिवासी लोकांसह मुक्त वावर आणि मंदिराची पायवाट ही इथली खास आकर्षणे आहेत. आलिया आणि रणबीर गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. आलिया आणि रणबीरने एकत्र नवीन घर खरेदी केल्याचीही चर्चा आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाउन नसता तर आतापर्यंत लग्न केलं असतं, असं वक्तव्य रणबीरने पत्रकार राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.