meenakshi rathod baby photo shoot  sakal
फोटोग्राफी

PHOTO : 'सुख म्हणजे..' फेम मीनाक्षी राठोडच्या चिमुकलीचे क्यूट फोटो..

अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे यांनी आपल्या मुलीचे खास फोटोशूट केले आहे.

नीलेश अडसूळ

मालिका विश्वातील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (sukh Mhanje nakki kay Aste) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री मीनाक्षी राठोडनं काही दिवसंपूर्वीच एक गोड बातमी चाहत्यांना दिली. मीनाक्षी (meenakshi rathod) आणि कैलास वाघमारे (kailash waghmare) यांना मुलगी झाल्याची ही आनंदवार्ता त्यांनी सोशलमिडियावर शेअर केली. त्यांनतर मनोरंजन विश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मीनाक्षी आणि कैलास दोघेही सोशल मीडिया वर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. मीनाक्षीच्या प्रेग्नन्सी दरम्यान केलेल्या बेबी बंप फोटोशूटचीही बरीच चर्चा होती. आता त्यांनी आपल्या चिमुकलीचे खास फोटोशूट केले आहे. हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. (sukh mhanje nakki kay asta fame meenakshi rathod's daughter first photoshoot )

मीनाक्षीने 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत देवकी ही भूमिका साकारली होती. तर कैलास वाघमारेने तान्हाजी, हाफ तिकीट, ड्राय डे अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कायम वेगळ्या भूमिका आणि कलाकृती घेऊन मीनाक्षी आणि कैलास प्रेक्षकांसमोर येत असतात.
मध्यंतरी त्यांच्या लग्नाचे फोटो त्यांनी शेअर केले होते. त्यांनंतर मीनाक्षी आई होणार असल्याची गोड बातमीही त्यांनी समाज माध्यमांवरून चाहत्यांना दिली होती.
मीनाक्षीने प्रसूती आधीही एक सुंदर फोटोशूट केले होते. जे प्रचंड गाजले.
आपल्या मुलीसाठी एक छान नाव सुचवा असेही नुकतेच तिने सोशल मिडियावर पोस्ट केले होते.
कैलासने आजवर वेगवेगळ्या नाटकांमधून अनेक प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकातील भूमिकेचं जाणकार प्रेक्षक, समीक्षकांनी कौतुक केलं होतं.
त्यांच्या या नव्या पाहुणीचे हे गोड आणि गोंडस फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT