Sundar Pichai Birthday : जगातील अव्वल क्रमांकाचे सर्च इंजन असलेल्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई 10 जुलै रोजी आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सुंदर पिचाई यांचा जन्म 10 जून 1972 रोजी मदुराई येथे झाला आहे.
चेन्नईमधील अशोक नगर येथे दोन खोलींच्या घरांत पिचाई यांनी आपलं बालपन घालवलं आहे. आयआयटी खरगपूरमधून (1989-93) त्यांचे अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर म्हणून ओळख असलेले पिचाई, 2004 पासून गुगलमध्ये कार्यरत आहेत.
पिचाई यांनी अंजली यांच्याशी लग्न केलं आहे. या दोघांची भेट आयआयटी खरगपूरमध्येच झाली होती. त्यांना दोनं आपत्य आहेत.
10 ऑगस्ट 2015 पासून ते गुगलचे सीईओ (मुख्य कार्यकारी आधिकारी) म्हणून काम करत आहेत. गुगलसोबतच पिचाई Alphabet चेही CEO आहेत. डिसेंबरमध्ये गुगलने त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. गुगलसोबत Alphabet चे CEO झाल्यानंतर पिचाई यांच्या पगारातही मोठी वाढ झाली आहे. पिचाई जगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ आहेत. Alphabet कंपनीचे CEO झाल्यानंतर त्यांच्या पगारातही मोठी वाढ झाली. 2020 मध्ये पिचाई यांचा मूळ पगार 15 कोटी रुपये (20 लाख डॉलर) इतका होता. याशिवाय अन्य भत्त्यांचे 37 कोटी रुपये (50 लाख डॉलर) मिळतात. या दोन्हीला एकत्र केल्यास त्यांचा पगार जवळपास 52 कोटी रुपये इतका होतो. 2020 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सुंदर पिचाई यांचा समावेश झाला होता. टाइम मॅगजीनने 100 प्रभावशाली व्यक्तीमध्ये सुंदर पिचाई यांचे नावही सामाविष्ट केलं होतं. सुंदर पिचाई मागील 16 वर्षांपासून गुगलमध्ये काम करत आहेत. सध्या त्याच कंपनीत ते सीईओ या पदावर कार्यरत आहे. कोट्यवधी भारतीयंचे ते आदर्श आहेत. गुगलचं क्रोम ब्राऊझर तयार करण्यामागे पिचाई यांचा मोलाचा वाटा आहे. 2008 मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली गुगल क्रोम ही नवी प्रणाली स्थापन करण्यात आली. क्रोमच्या यशानंतर जीमेल अॅपचेही काम पिचई यांच्याकडे आले.
पिचाई यांना क्रिकेट आणि फूटबॉलचे प्रचंड वेड आहे. याबद्दल ते अनेकदा उघडपणे बोलले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.