नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल टीमचे कर्णधार सुनील छेत्री याचा आज वाढदिवस. 3 ऑगस्ट 1984 मध्ये तेलंगणामध्ये जन्मलेला सुनील छेत्री आज 37 वर्षांचा झाला आहे. सुनील छेत्री याने आपल्या करिअरमध्ये खूप मोठ्या पातळ्या गाठल्या आहेत. भारतासाठी सर्वात जास्त गोल करणारा तो खेळाडू ठरला आहे. 2007 साली पाकिस्तानविरुद्धच्या सामान्यात आपल्या जागतिक कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या सुनिलने आपल्या करिअरमध्ये कित्येक चढ-उतार पाहिले आहेत. आज भलेही सुनील फुटबॉल स्टार आहे पण एक काळ असा होता की, जेव्हा त्याला टीमच्या कोचने अपयशी खेळाडू असे म्हटलं होतं. चला जाणून घेऊ या, कर्णधार छेत्री यांच्याबाबात 5 मोठ्या गोष्टी.
1. सुनील छेत्रीने आपल्या इंटरनॅशनल करिअरमध्ये 118 मॅचमध्ये 74 गोल केले आहेत. त्यांचा प्रत्येक मॅचनुसार गोल रेकॉर्ड 0.63 टक्के आहे जो रोनाल्डो आणि मेस्सी पेक्षाही चांगला आहे. रोनाल्डोचा प्रति मॅच गोल रेकॉर्ड 0.63 टक्के आहे तर मेस्सीचा अर्जेंटीनासाठी प्रति मॅच गोल रेकॉर्ड 0.5 टक्के आहे. तसे सर्व खेळाडूंमध्ये सर्वात जास्त इंटरनॅशनल गोलच्या बाबतीत रोनाल्डो 109 गोल सोबत पहिल्या स्थानावर आहे. युएईच्या अली मबखाऊत आणि लियोनिल मेसीचे 76 गोलसोबत दुसऱ्या स्थानावर आहेत तर सुनील छेत्री तिसऱ्या स्थानावर आहेत.2. सुनीलला खेळाचा वारसा त्यांची आई सुशीला छेत्री आणि त्यांच्या दोन जुळ्या बहिणीकडून मिळाला आहे. सुनील छेत्री यांची आई आणि त्यांच्या बहिणी नेपाल फुटबॉल टीमच्या सदस्य आणि इंटनॅशनल फुटबॉल खेळाडू होत्या. सुनील छेत्रीने सन 2017 मध्ये मोहन बागानचे दिग्गज सुब्रत भट्टाचार्य यांची मुलगी आणि लॉन्गटाईम गर्लफ्रेंड सोनम भट्टाचार्यसोबत विवाह केला.3. सुनील छेत्री जेव्हा 2012 साली पोर्तुगाल क्लब स्पोर्टिंग लिस्बन सोबत जोडले होता तेव्हा त्या टीमच्या हेड कोचने त्याचा अपमान केला होता. सुनील छेत्री याने एक इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, कोचने त्याच्या क्षमतेवर प्रश्न उठवित 'ए' टीममधून 'बी' टीममध्ये पाठविण्याचा उल्लेख केला होता. सुनील छेत्री 9 महिन्यापर्यंत क्लबसोबत होते, ज्यामध्ये त्याला फक्त 5 मॅच खेळण्याची संधी दिली होती. सन 2010मध्ये छेत्री हा अमेरिकाच्या कान्सास सिटी विजार्डस सोबतही होता, त्यानंतर 1 वर्षातच तो भारतात परतला.4. सुनील छेत्री भारतासाठी 50 गोल करणारा पहिले खेळाडू ठरला आणि 6 वेळा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा प्लेअर ऑफ द ईयर ऑवर्ड देखील त्याने जिंकला आहे. सुनील छेत्री याने सन 2007 मध्ये सर्वात पहिल्यांदा हा सन्मान मिळविला. यानंतर 2011, 2013, 2014, आणि 2018-19 मध्ये एक वेळा 'फिल्ड प्लेअर ऑफ द ईयर' ठरला होता. 5. सुनील छेत्री याचे वडील आर्मीमध्ये होते त्यामुळे त्याने देशातील कित्येक भागांमध्ये वास्तव्य केले आहे. सुनील छेत्री याने गंगटोक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने दिल्लीच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्येही शिक्षण घेतले. त्याने कोलकत्तामध्ये शिक्षण घेतले असून 12वी नंतर त्यांनी शिक्षण सोडून दिले. कारण त्यानंतर त्यांचे फुटबॉल करिअर चमकले होते. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.