Sunil Chhetri Lead Indian Football Team Journey In AFC Asian Cup qualification esakal
फोटोग्राफी

PHOTO : असा झाला भारतीय फुटबॉल संघाचा आशियाई कप 2023 पर्यंतचा प्रवास

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारतीय पुरूष फुटबॉल संघाने जबरदस्त कामगिरी करत एएफसी आशियाई कप 2023 मध्ये पात्र झाला आहे. भारताने आपल्या ग्रुपमध्ये कंबोडिया, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांना पराभवाची धूळ चारली. भारताच्या या एएफसी आशियाई कप 2023 पात्रता फेरीतील दैदिप्यमान प्रवासाचा फोटोंद्वारे घेतलेला आढावा. (AFC Asian Cup qualification)

कंबोडिया (Cambodia) : एएफसी आशियाई कप 2023 पात्रता फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताने कंबोडियाचा 2 - 0 ने पराभव केला. यासामन्यात भारताने 776 पासेसे दिले. त्याीतल 705 पासेस अचूक होते. दोन्ही गोल सुनिल छेत्रीने मारले. त्याने प्रत्येक हाफमध्ये एक गोल केला. भारताने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टवर तब्बल 24 शॉट दागले होते.
अफगाणिस्तान (Afghanistan) : भारतीय फुटबॉल संघाने अफगाणिस्तान विरूद्ध देखील जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी ग्रुप डीच्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा 2 - 1 ने पराभव केला. 1 - 0 अशा पिछाडीवर असणाऱ्या भारताकडून सुनिल छेत्रीने 86 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर सहल अब्दुल समादने 90 + 2 एक्स्ट्रा टाईममध्ये गोल करून रोहमर्षक विजय मिळवला.
आशियाई कप पात्रता (AFC Asian Cup qualification) : भारत आपला ग्रुप स्टेजमधील शेवटचा तिसरा सामना खेळण्यापूर्वीच आशियाई कप फुटबॉल 2023 साठी पात्र झाला. पेलेस्टिनने फिलिपिन्सचा 4 - 0 असा पारभव केल्यामुळे भारत क्वालिफाय झाला. या स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा आणि इतिहासात पाचव्यांदा पात्रता फेरी पार केली आहे.
हाँग काँग (Hong Kong) : आशियाई कप 2023 साठी पात्र झालेल्या भारताने आपल्या ग्रुपमधील शेवटच्या सामन्यात हाँग काँगचा 4 - 0 असा पारभव केला. कोलकात्याच्या व्हीवायबीकेएस स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अन्वर अली, सुनिल छेत्री, मनवीर सिंह, इशान पंडिता यांनी भारतासाठी गोल केले.
सुनिल छेत्रीचा (Sunil Chhetri) 84 वा आंतरराष्ट्रीय गोल : हाँग काँगविरूद्धच्य सामन्यात भारताचा कर्णधार सुनिल छेत्रीने आपला 84 वा आंतरराष्ट्रीय गोल दागला. याचबरोबर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर राहिला. त्याने रिअल माद्रिदचा स्टार प्लेअर आणि हंगेरीकडून खेळणाऱ्या फेरेन्स पुस्कासच्या विक्रमाशी बरोबरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT