बहूप्रतिक्षित बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची नुकतीचं धुम धडाक्यात सुरवात झाली. तिसऱ्या पर्वामध्ये विविध अभिनेता- अभिनेत्रींसह किर्तनकार शिवलीला पाटील यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे. किर्तनकार शिवलीलाचे व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतात.
पुरुषांचे क्षेत्र म्हणून मानल्या गेलेल्या कीर्तनाच्या क्षेत्रात आलेल्या महिला कीर्तनकारांनी ठसा उमटवला आहे. शिवलीला पाटील हे त्यांपैकी एक नाव. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे तिचं गाव. वेगळ्या वाटेनं वाटचाल करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या समाजप्रबोधन करत आहेत.शिवलीला पाटील यांचे वडील बाळासाहेब पाटील कीर्तनकार आहेत. कथनशैलीचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं. वयाच्या पाचव्या वर्षी शिवलीला कीर्तन करू लागली. त्यानंतर तिनं अनेक गावांत कीर्तनं केली. तिच्या कीर्तनाला प्रतिसाद मिळू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा चाहता वर्ग बनवला. तिनं एक हजार कीर्तन केली.पुढं महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिनं आपली कीर्तनाची आवड जोपासली. अस्सल ग्रामीण भाषा, तर कधी प्रमाण मराठी भाषेचा वापर करत ती निरूपण करते. कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, समाजातील वेगवेगळ्या गोष्टी, अधूनमधून विनोदाची पेरणी करत कीर्तन करते. तिनं स्वतःची एक शैली निर्माण केली आहे. ही शैली लोकांना भिडणारी आहे. सोशल मीडियावर तिला मानणारा एक वर्ग आहे. तरुणाईला साद घालत ती जीवनमूल्यं सांगते. ती लोकांशी संवाद करत अभंगाचं निरूपण करते. कमी वेळेत तिनं आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.आता शिवलीला हिने बिगबॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे. दरम्यान शिवलीलाच्या समर्थकांपैकी काही जणांना मात्र तिचे बिगबॉसच्या घरात जाणे रुचले नाही. कित्येकांनी सोशल मिडियावर कॉमेंट करुन नाराजी व्यक्त केली आहे. ''खरं तर यांना बिग बॉसच्या घरात यायची गरज नव्हतीच. एकाने ''शिवलीलाताई तुम्ही कीर्तनकार आहात तुमची समाजाला गरज आहे बिग बॉसला नाही'' तर दुसऱ्याने, ''ताई ,मला वाटतं हा तुमचा निर्णय चुकीचा ठरेल अशी प्रतिक्रियाही दिली आहे. शिवलीलाला अश्रु अनावर... :
आज शिवलीला घरामध्ये थोडीशी भाऊक होताना दिसणार आहे. तिचे म्हणणे पडले, “आईला बघताना कसे वाटत असेल, कसं वागावं कळतं नाहीये”. त्यावर मीनलने तिला समजावले “तू खूप छान वागते आहेस. चांगलं खेळते आहेस. तुझी मत क्लिअर आहेत. तुला कधीही काही वाटलं तर मी आहे तुझ्यासोबत. विशाल निकम देखील म्हणाला “माऊली तुम्ही खूप खंबीर आहात”.
शिवलीला पाटील यांच्या नावाचं कनेक्शन :
शिवलीला यांच्या आईने सांगितले की लग्नाच्यानंतर जवळपास सात वर्षे त्यांना मुल झाले नव्हते. नंतर त्यांनी शिवलीला ग्रंथाचं १०८ वेळा पारायण केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बाळ झाल्याचे स्वप्न पडले. शिवलीला यांच्या आईने त्यांच्या आईला याबाबत सांगितले तर त्यांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही. शिवलीला यांच्या आई डॉक्टरकडे गेल्या तेव्हा डॉक्टरांनी त्या प्रेग्नंट असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी मुलीचे नाव शिवलीला ठेवले असे सांगितले आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.