Swara Bhaskar Marriage PHOTOS 
फोटोग्राफी

Swara Bhaskar Photos : स्वरा-ट्विटरचं नातं अतूट! 'शादी मुबारक' होतंय ट्रेंड

सकाळ डिजिटल टीम

Swara Bhaskar Marriage Photos : बॉलिवुडची अभिनेत्री स्वरा भस्करने समाजवादी पक्षाचा नेता फहद अहमद याच्या सोबत कोर्ट मॅरेज उरकलं. यानंतर आता स्वरा फहद हे दोघे संपूर्ण रीती रिवाजानुसार लग्न करणार आहेत. ते पुढील महिन्यात लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

स्वरा भास्करने १६ फेब्रुवारीच्या रात्री तिच्या लग्नाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच दिली. तिने रजिस्टर मॅरेज उरकल्याचं सांगताच सोशल मीडियावर लोक प्रतिक्रिया देऊ लागले आहे.
स्वरा ही तिने घेतलेल्या राजकीय, सामाजिक विषयांवरूल भूमीकांमुळे नेहमीच चर्चेत असते. याच कारणामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल देखील केलं जातं. स्वरा काहीही बोलली तरी ती ट्विटरवर ट्रेंड होऊ लागते.
स्वराने लग्नाची घोषणा करताच ट्वीटरवर स्वरा नेहमीप्रमाणे पुन्हा ट्रेंड होऊ लागली. या गोड बातमीनंतर स्वराचे चाहते तिला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.
कालपासून ट्विटरवर स्वरा भास्कर, शादी मुबारक हे ट्रेंड सुरू आहेत, हजारो लोक याबद्दल ट्विट करताना दिसत आहेत.
तसेच स्वराने इतर बॉलिवुड कपल्स प्रमाणे पैसा खर्चून मोठा लग्न सोहळा न करता साधेपणाने कोर्ट मॅरेज केलं याचं कौतुक देखील होत आहे.
तसेच या ट्रोलिंग दरम्यान बॉलिवुड आणि राजकीय या दोन्ही क्षेत्रातून स्वरा फहद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे.
स्वराचा राजकारणाशी तसा काही संबंध नाही मात्र यापूर्वी ती काँग्रेस नेता कन्हैया कुमार जिग्नेश मेवाणी यांच्या प्रचारासाठी आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत देखील सहभागी झाली होती. आता राजकीय नेत्याशीच लग्नगाठ बांधल्याने तीची राजकारणाशी जवळीक वाढली असे म्हणणे गैर ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांना रोज 550 कोटींचा तोटा! सरकारच्या दाव्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

Marital Dispute: पत्नीच्या प्रेमसंबंधातून धर्मांतराचा कट? पत्नीच्या वागण्यात बदल झाल्याचा पतीचा दावा, मुंबईतील बँकेकडे मोठी मागणी

Panhala Accident News : नातीचा चेहरा पाहून परतणाऱ्या आजीवर काळाचा घाला, पन्हाळ्यातील घटनेने हळहळ

SRH vs RR, Eliminator: "नेट्समध्ये वैभवला मी...", जोफ्रा आर्चरचे १५ वर्षांच्या सूर्यवंशीला आऊट करण्याबद्दल भन्नाट उत्तर; VIDEO

SCROLL FOR NEXT