शिक्षक दिनाबद्दल बोलायचं म्हणलं तर बॉलिवूडच्या स्टायलिश 'टीचर्स' बद्दल बोलायचे नाही म्हणजे, ते कसे चालेल! असे अनेक सितारे आहेत ज्यांनी शिक्षकांची भुमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच, त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटबद्दल बोलताना, त्यांची फॅशनेबल स्टाईल आणि लूक देखील फॅशन प्रेमींना खूप आवडल्या. चला, बॉलिवूडच्या अशा स्टायलिश 'शिक्षकां'वर एक नजर टाकूया.
तान्या शर्मा (देसी बॉइझ):
देसी बॉइझ या चित्रपटात चित्रांगदा सिंगने तान्या शर्माची भुमिका साकारली आहे. त्यामध्ये तिला शिक्षिका होण्याची संधी मिळाली आहे. राज आर्यन मल्होत्रा (मोहब्बतें):
मोहब्बतें या चित्रपटातील शाहरुख खानचे नाव राज आर्यन मल्होत्रा होते. एवढेच नाही तर त्याची स्टाईलही एक ट्रेंड बनली. अंगावर स्वेटर आणि पातळ फ्रेम चष्मा असलेले हलके रंगाचे पॅंट-शर्ट 2000 च्या दशकातील मेजर ट्रेंड होते.मिस चांदनी (मैं हूं ना):
मैं हूं ना या चित्रपटात सुष्मिता सेनने टीचर्स म्हणून भूमिका साकारली. शिफॉन साडी, हाल्टर-नेक ब्लाउज आणि स्ट्रेट हेअर्समध्ये शिकवणाऱ्या 'मिस चांदनी' चे पात्र साकारणारी अभिनेत्री सुष्मिता सेन स्टाईल आयकॉन बनली. तिच्या या भूमिकेनंतर शिफॉन साड्यांची प्रचंड क्रेझ वाढली.राहुल प्रकाश उद्यावर (पाठशाला) :
पाठशाला या चित्रपटात शाहिद कपूरने राहुल प्रकाशची भूमिका साकारली, जो एक हुशार शिक्षक ठरला. ज्याला मुख्यतः डेनिम आणि पांढरा शर्ट असलेला वेस्टकोट घातलेला दिसून आला. शाहिद कपूरची ही गोंडस शिक्षक शैली चाहत्यांना खूप आवडली.अवंतिका आहुजा (कुर्बान):
कुर्बान या चित्रपटात करीना कपूरने अवंतिका आहुजाची भूमिका साकारली. यात करीनाने एक उत्तम शिक्षिका आणि प्रेमळ पत्नी म्हणून काम केले आहे. नारायण शंकर (मोहब्बतें):
मोहब्बते या चित्रपटात अमिताभ बच्चन (बिग बींनी) यांचे नाव नारायण शंकर होते. गुरुकुलचे कुलपिता म्हणून ते विद्यार्थ्यांना शिस्तीवर आधारित जीवन जगण्याचा उपदेश दिलाय.नैना माथुर (हिचकी):
हिचकी 'फ्रंट ऑफ द क्लास' या चित्रपटात राणी मुखर्जीने नैना माथुरची भूमिका साकारली आहे. त्यामध्ये तिला शिक्षिका होण्याची संधी मिळाली आहे. हा चित्रपट अतिशय मस्त आणि राणीने तो देसी अंदाजात आणला आहे.राम शंकर निकुम्ब (तारे जमीन पर ) :
आमिर खानचे हे पात्र आजही लोकांच्या हृदयाला स्पर्श करते. स्टाईलबद्दल बोलायचे म्हणले तर, अमीरचा मस्त आणि कॅज्युअल लुक, स्पाईक्ड हेअर्स, फुल स्लीव्ह टीशर्ट आणि डेनिम्समध्ये त्याच्या विद्यार्थ्यांइतकाच प्रेक्षकांना आवडला.ज्योती ठाकूर (चॉक अॅन्ड डस्टर):
चॉक अॅन्ड डस्टर या चित्रपटात जुही चावलाने ज्योती ठाकूरची भूमिका साकारली. जुहीने शाळेतील शिक्षकाच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात जुही चावला ला प्रथमच शिक्षिका होण्याची संधी मिळाली आहे. अंजली माथुर (पाठशाला) : पाठशाला या चित्रपटात आयशा टाकियाचे नाव अंजली माथुर होते. आयशाने होमसायन्स टीचर्स म्हणून भूमिका साकारली आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.