Cricketers Love Story: Rahul Chahar And Ishani Johar love story esakal
फोटोग्राफी

Cricketer Love Story: या स्वप्नसुंदरीच्या प्रेमात पडला होता राहुल चहर, समुद्रकिनाऱ्यावर केलं रोमँटिक लग्न

२३ वर्षीय लेग स्पिनर राहुल चाहरच्या मनावर राज्य करणारी ही सुंदरी आहे तरी कोण ? चला तर जाणून घेऊया राहुल चहरची फिल्मी लव स्टोरी.

सकाळ ऑनलाईन टीम

टीम इंडियाचा क्रिकेटर राहुल चाहर त्याच्या दमदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याचे क्रिकेटचे किस्से तर जगभऱ्यात गाजलेच पण त्याचबरोबर त्याची लव स्टोरीही चांगलीच गाजलेली आहे. याच वर्षी या खेळाडूने त्याच्या लाँग टाईम गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. २३ वर्षीय लेग स्पिनर राहुल चाहरच्या मनावर राज्य करणारी ही सुंदरी आहे तरी कोण ? चला तर जाणून घेऊया राहुल चहरची फिल्मी लव स्टोरी.

लेग स्पिनर राहुल चाहरच्या पत्नीचे नाव आहे ईशानी जौहर. अनेक वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. ९ मार्च २०२२ ला गोव्याच्या शानदार वेडिंग डेस्टिनेशनवर या दोघांनी लग्न केलं.
राहुल चाहर आणि ईशानी जौहर यांचा २०१९ मध्ये साखरपुडा झाला होता. ईशानी जौहर ही प्रोफेशनल फॅशन डिझाईनर आहे. अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
राहुल चाहर सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. पत्नी ईशानीसोबत तो अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतो. एकमेकांचं प्रेम हे दोघेही उघडपणे जगासमोर त्यांच्या रोमँटिक फोटोद्वारे व्यक्त करताना दिसतात.
२३ वर्षीय लेग स्पिनर राहुल चाहरने भारतासाठी ६ टी २० सामना खेळला आहे. यामध्ये त्याने ७ विकेट काढल्या होत्या. तसेच २०२१ मध्ये श्रीलंकेविरूद्ध एकमेव वनडे सामना खेळला आहे. या सामन्यात त्याने ३ विवेट काढल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT