tennis player Novak Djokovic True Love Story With Jelena Ristic sakal
फोटोग्राफी

पैसे नसायचे अन् तिची भेट टळायची; ग्रँडस्लॅमच्या राजाची प्रेमकहाणी

Kiran Mahanavar

सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविच हा जगातील नंबर 1 टेनिसपटू आहे. जोकोविचने २० ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. ग्रँडस्लॅमच्या या राजाची लव्हस्टोरी ही मनोरंजक अशीच आहे.

34 वर्षीय जोकोविच विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव जेलेना जोकोविच आहे. ती अनेकदा टेनिस कोर्टवर पतीला प्रात्साहन देतानाही दिसते.
दोघेही जवळपास एक दशक एकमेकांना डेट करत होते. या जोडप्याची प्रेमकहाणी लहानपणापासून सुरू झाली होती. बराच काळ एकमेकांना समजून घेतल्यानंतर या जोडप्याने 2014 मध्ये लग्नगाठ बांधली.
लग्नापूर्वी या जोडप्याने त्यांच्या नात्यात अनेक चढउतार पाहिले होते. वास्तविक, जेलेना तिच्या अभ्यासानिमित्त काही काळ मिलानला गेली होती.
दोघेही काही काळ लांबच्या नात्यात होते पण प्रेम कधीच कमी झाले नाही. यादरम्यान फोन आणि मेसेजवर सतत चर्चा होत होती.
नोवाकने आपल्या टेनिस कारकिर्दीसाठी कठोर परिश्रम सुरूच ठेवले होते, तर जेलेना तिच्या अभ्यासाबद्दल खूप गंभीर होती.
मात्र, या काळात दोघेही वेळ मिळेल तेव्हा एकमेकांना भेटायचे. दोघेही करिअरच्या सुरुवातीच्या काळात असले तरी सतत भेटणे अवघड होते.
पैशाच्या कमतरतेमुळे दोघेही क्वचितच एकमेकांना भेटू शकले. प्रत्येक संकटात जोकोविचची साथ देणाऱ्या जेलेनाला या स्टार खेळाडूने 2013 मध्ये प्रपोज केले होते.
2014 मध्ये विम्बल्डन जिंकताना, जोकोविचला जेलेना गरोदर असल्याचे कळले. हा मोठा विजय त्यांनी जन्माला येणार्‍या पत्नी आणि मुलाला समर्पित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांचा सहभाग

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT