Terence Lewis
Terence Lewis sakal
फोटोग्राफी

HBD: नोरासोबत असलेल्या डेटींगच्या चर्चेवर टेरेन्स लुइस काय म्हणतो..

सकाळ डिजिटल टीम

रिऍलिटी शोमध्ये गाजलेले नाव म्हणजे टेरेन्स लुइस. एक उत्तम परिक्षक म्हणून तो ओळखला जातो. प्रेक्षकांचा आवडता परीक्षक म्हणूल टिव्ही जगतात त्याची ख्याती आहे. टेरेन्स लुईस याचा जन्म १० एप्रिल, १९७५ला मुंबईत झाला. टेरेन्सला लहानपणापासून डान्सची आवड होती.

नृत्याच्या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या हृदयात बसलाय. हिंदी भाषेवर प्रभुत्व, नृत्याची अचूक पारख आणि स्टायलिश अंदाज यासाठी प्रसिद्ध असलेल्या टेरेन्स लुइस या नृत्य दिग्दर्शकाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
टेरेन्सच्या नृत्यशैलीचे चाहते तर आहेतच शिवाय त्याच्या एखाद्या नृत्यातील बारकावे टिपत तो स्पर्धकांना योग्य ते मार्गदर्शन करतो. 'इंडियाज बेस्ट डान्सर'विषयी तो म्हणतो 'आमच्यात अनेकदा दीर्घ चर्चा रंगते. वाद होतात. परीक्षक म्हणून असे वाद होणं स्वाभाविक आणि गरजेचं आहे. कारण त्यातूनच सर्वोत्तम स्पर्धक शोधता येतो.'
टेरेन्सनं आतापर्यंत ११ वेळा डान्स रिअ‍ॅलिटी शोचं परीक्षण केलं असून २५ हून अधिक चित्रपट आणि म्युझिक अल्बमचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे.
एका डान्स शोमध्ये नोरा आणि टेरेन्स यांची केमिस्ट्री बघता या कपलच्या डेटींगच्या चर्चा ही सुरु झाल्या होत्या. टेरेन्स आणि नोरा हे रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जाते. मात्र यावरही दोघांनीही कधी उघडपपणे सांगितले नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT