कोलकाता हे भारतातील सर्वात ऐतिहासिक आणि जगभरात प्रसिध्द असलेल्या शहरांपैकी एक आहे. या शहरात जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतींची मिलाफ झालेला आपल्याला दिसेल. चिनी, ज्यू आणि इतर स्थलांतरित समुदायांचे लोक मोठ्या लोकसंख्येने कोलकाता शहरात राहातात. त्यामुळे या शहराची वास्तुकलेचे आश्चर्यकारक नमुने आपल्याला पाहायला मिळतात. कोलकाता ही सुरुवातीला ब्रिटीश राज्याची राजधानी होती, याचा अर्थ स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी बांधलेल्या अनेक वास्तू शहरात अजूनही अस्तित्त्वात आहेत. राजवाडे आणि संग्रहालये पासून ते चर्च आणि वाड्यांपर्यंत, आमच्या जॉय सिटीमध्ये बरीच सुंदर हेरिटेज साइट आहेत ज्यांना आपण भेट दिलीच पाहिजे.
नॅशनल लायब्ररी- पुस्तकांच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे वाचनालयात असलेल्या या ग्रंथालयात 21,00,000 पेक्षा अधिक पुस्तके आहेत ज्यात डिजिटल पुस्तके , नकाशे, नियतकालिक, हस्तलिखिते इत्यादींचा समावेश आहे. या लायब्ररीचे सदस्यत्व विनामूल्य आहे. जरी आपण वाचक नसले तरीही, 30 एकरांच्या समृद्ध बागेतून फिरा. बेलूर मठ- हुगली नदीच्या पश्चिमेला असलेले बेलूर मठ रामकृष्ण मठ व मिशनचे मुख्यालय आहे. या जागेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती आणि हिंदू, इस्लामिक, बौद्ध आणि ख्रिश्चन या सर्व धर्मातील ऐक्य दर्शविणारी भव्य वास्तुकला म्हणून ओळखले जाते. 40 एकरांवर पसरलेला बेलूर मठ हा रामकृष्ण ऑर्डरचा मुख्य मठ आहे. याखेरीज येथे रामकृष्ण, सारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांची मंदिरे आणि परिसरात एक संग्रहालय आहे. सोवाबाजार राजबारी- सोवाबाजार राजबारी ही आणखी एक सुंदर इमारत असून या इमारतील दुर्गापूज च्या वेळी भेट देणे एक वेगळीच पर्वणी असते. हे बंगालमधील सर्वात जुन्या राजवाड्यांपैकी एक आहे. राजा नबकृष्णाने बांधलेली ही इमारत आपल्या भव्य दुर्गापूजा उत्सवांसाठी तसेच बंगाली संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठीही प्रसिद्ध आहे.जोरसांको ठाकुरी बारी- कोलकातामधील आणखी एक ऐतिहासिक जागा म्हणजे जोरासांको ठाकुर बारी, हे ठिकाण म्हणेज नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे वडिलोपार्जित घर आहे. अठराव्या शतकातील हे निवासस्थान बुराबाजारच्या प्रसिद्ध सेत परिवाराने टागोरांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांना दान केलेल्या जमिनीवर बांधले होते. हे टॅगोर हाऊस म्हणून देखील ओळखले जाते. हे तेच घर आहे ज्यात प्रख्यात कवी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी आपल्या बालपणातील एक मोठा काळ या जागेत घालवला आणि त्यांनी शेवटचा श्वास देखील याच जागेत घेतला. सध्या या घराचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले असून त्यात टागोरांच्या जीवनाशी संबंधित पुस्तके, हस्तलिखिते व इतर पुरातन वास्तूंचा संग्रह आहे.राइटर्स बिल्डिंग- 1970 च्या उत्तरार्धात बांधलेली ही प्रतिष्ठित इमारत सर्वप्रथम 1780 मध्ये जनतेसाठी उघडली गेली आणि बी.बी.डी. बागेत स्थित आहे. ही सध्या राज्य सरकारची सचिवालय इमारत आहे, परंतु पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या कनिष्ठ लिपिक किंवा लेखकांचे घर होते. ग्रीको-रोमन एक्सटिरीयर असलेल्या या इमारतीत 128 फूट लांबीचा व्हरांडा असून त्यामध्ये स्तंभ, लोखंडी पायऱ्या, ग्रीक देवतांची मूर्ती, रोमन देवी मिनेर्वाची मूर्ती आहेत. मार्बल पॅलेस- संगमरवरी भिंती आणि फरशी असलेली एक मोहक इमारत, बंगाली व्यापारी राजा राजेंद्र मलिक यांनी बांधली होती. न्यूक्लॉसिकल शैलीत बांधलेल्या या इमारतीत खुल्या अंगण आहेत जे पारंपारिक बंगाली आर्किटेक्चरमध्ये सर्रास दिसून येते. आज यामध्ये बरीच व्हिक्टोरियन पेंटिंग्ज आहेत. मात्र या इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला पूर्व परवानगीची आवश्यकता आहे कारण ते खाजगी निवासस्थान आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.