महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना फक्त देशालाच नव्हे तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली तर साऱ्या जगाला अहिंसेचे महत्त्वही पटवून दिले. आज 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक जण त्यांचे स्मरण करत आहे. महात्मा गांधी यांच्या तत्वांनुसार आजही कित्येक लोक जगत आहे. महात्मा गांधी यांच्या जीवनप्रवासाबाबत कित्येक किस्से ऐकले असतील. काही फिल्ममेकर यांनी गांधीजींच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आज गांधीजयंती निमित्त अशा काही चित्रपटांबाबत जाणून घेऊ या...
गांधी माय फादर : डायरेक्टर फिरोज अब्बास खान यांनी गांधीजींच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनविला होता ज्यामध्ये गांधीजी आणि त्याचा लहान मुलगा हरिदास यांच्या नात्यावर प्रकाश टाकला आहे. या चित्रपटात अभिनेता दर्शन जरीवाला यांनी महात्मा गांधी यांची भूमिका साकारली आहे तरी अभिनेता अक्षय खन्ना यांची त्यांचा मुलगा हरिलाला यांची भूमिका साकारली आहेगांधी : वर्ष 1982मध्ये फिल्ममेकर रिचर्ड एटनबरो यांनी गांधींजीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवले होता, ज्याला ऑस्कर ऑवर्ड मिळाला होता. या चित्रपटामध्ये हॉलीवूड अॅक्टर बेन किंस्ले यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती.द मेकिंग ऑफ महात्मा : फिल्ममेकर श्याम बेनिवाल यांनी महात्त्मा गांधी जेव्हा अफ्रिकेमध्ये बॅरिस्टरची प्रॅक्टीस करत होते तेव्हाचा काळ दाखविला आहे. या चित्रपटामध्ये जेव्हा गांधीजी स्वातंत्र्यासाठी भारतात आले नव्हते तो काळ दाखविला आहे.लगे रहा मुन्नाभाई :
गांधीजीच्या विचारधारेवर आधारित कोणता चित्रपट बनविला असेल तर तो आहे लगे रहा मुन्नाभाई. या चित्रपटामध्ये गांधीच्या विचारांना एक वेगळा ट्विस्ट देण्यात आला होता ज्याला गांधीगिरी असे म्हटले जाते. या चित्रापटातील मुन्नाभाईला गांधीजी दिसत असल्याचा भास होत असतो. मुन्नाभाईची भूमिका अभिनेता संजय दत्त याने साकारली आहे.हे राम : डायरेक्टर कमल हासन यांनी गांधी हत्या आणि देशाच्या विभागणीनंतर झालेल्या दंगलींवर आधारित हा चित्रपट बनविला होता. या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह यांनी महात्मा गांधी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी, अतुल कुलकर्णी, गिरीश कर्नाड आणि शाहरुख खान हे मुख्य भूमिकेत दिसले होते.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.