Food For Brain  esakal
फोटोग्राफी

मेंदू कार्यक्षम होण्यासाठी 'हे' नऊ पदार्थ खा!

आळशीपणा सोडून मेंदूला कार्यक्षम करण्यासाठी झटपट उर्जा देणारे पदार्थ खाणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात अनेकांना खूप आळस आणि सुस्ती येते. काही करू नये असे वाटते. किंबहुना सुस्ती आल्यामुळे डोकं काम करेनासं होतं. मेंदूला (Brain) चालना मिळत नाही. यादिवसात सारखे झोपावेसे (Sleep) वाटणे हे आरोग्याच्या दृष्टीने फारसे योग्य नाही. म्हणूनच आळशीपणा सोडून मेंदूला कार्यक्षम करण्यासाठी झटपट उर्जा देणारे पदार्थ खाणे गरजेचे आहे. पोषण आहारतज्ज्ञ उमा नायडू यांनी ९ पदार्थ सुचविले आहेत. ते खाल्ल्याने तुमचा मेदू कार्यक्षम होईल. उमा यांच्या मते, ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ (Food) मेंदूच्या कार्यासाठी चांगले आहेत.कारण ते मेंदूसाठी आवश्यक असतात, त्यामुळे अशा पदार्थांचा समावेश तुम्हाला आहारात करता येईल.

अंडी (Eggs)- अंड्यामध्ये असलेल्या नैसर्गित मल्टीव्हिटॅमिनममुळे मेंदूचे कार्य, समन्वय आणि स्मरणशक्ती सुधारतेच. शिवाय त्याचे कार्य चांगले चालण्यासाठी मदत मिळते.
सीफूड (Seafood) : सीफूडमध्ये ओमेगा 3 चे प्रमाण जास्त असते. तसेच मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे आवश्यक फॅट्स यामध्ये असतात.
हिरव्या भाज्या(Green Veggies) उमा यांच्या मते, मेंदूचे कार्य चांगले चालण्याबरोबर संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारण्यासाठी हिरव्या भाज्यांमुळे मदत मिळते.
बीट (Beets) - बीटात नायट्रिक ऑक्साईड असतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. तसेच मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन मिळते.
एव्होकाडो(Avocados)- एव्होकाडोमध्ये ल्युटीन मुबलक प्रमाणात असते. मेंदूच्या कार्यावर ल्युटीनचा खूप चांगला प्रभाव पडतो.
बेरीज (Berries)- बेरीज खाल्ल्याने मानसिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. तसेच मेंदूमधील रक्तपुरवठा वाढतो.
डार्क चॉकलेट (Dark Chocolate) - डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुमच्यातला मानसिक थकवा दूर होतो. मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारू शकते. तसेच स्मरणशक्ती वाढू शकते.
नट्स(Mixed Nuts)- नट्स मध्ये फॅट, प्रथिने आणि फायबर अतिशय चांगल्या प्रमाणात असते. यामुळे मेंदू - शरीराला चांगल्या प्रमाणात इंधन वा उर्जा मिळते
लिंबूवर्गीय फळे (Citrus Fruits) - लिंबूवर्गीय फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही फळे खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT