they became an overnight star from first movie, but Today they are out of Bollywood.. sakal
फोटोग्राफी

Photo: पहिल्याच चित्रपटातून रातोरात झाले स्टार, पण आज त्यांना..

एक काळ गाजवलेले बॉलीवुडचे काही कलाकार असे आहेत जे आज मनोरंजन विश्वातून पूर्णतः बाहेर आहेत.

नीलेश अडसूळ

बॉलीवूडमध्ये कोणत्याच कलाकाराची जादू कायमस्वरूपी टिकलेली नाही, आणि हेच चित्रपटसृष्टीचे कटू सत्य आहे. इथे स्टार बनणे सोपे आहे पण स्टारडम टिकवणे अवघड आहे. असे बॉलीवुडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली पण पुढे तर बॉलीवुड मधून पूर्णतः गायब झाले. आज आपण अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत...

(they became an overnight star from first movie, but Today they are out of Bollywood..)

कुमार गौरव- ८० च्या दशकात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्याशिवाय सुपरस्टार म्हणावे असे कोणी असेल तर ते कुमार गौरव होते. १९८१ मध्ये कुमार गौरवचा पहिला चित्रपट 'लव्हस्टोरी' रिलीज झाला होता. पहिल्याच चित्रपटापासून कुमार गौरवने ती यशोगाथा लिहिली, ज्यासाठी प्रत्येक अभिनेत्याला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाची प्रशंसा तर झालीच पण लोक त्याच्या 'बंटी' स्टाईल स्टेटमेंटचीही कॉपी करू लागले. पहिल्यांदाच स्टारडमची चव चाखणारा कुमार गौरव आज यश आणि इंडस्ट्री या दोन्हीपासून दूर आहे.
राहुल रॉय - भट्ट प्रॉडक्शनमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या राहुल रॉयने तो रातोरात प्रसिद्ध होईल याची कल्पनाही केली नसेल. त्याच्या 'आशिकी' या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अशी यशोगाथा लिहिली की राहुल पुढचा सुपरस्टार असेल असे वाटले. यानंतर त्याने 'सपने साजन के', 'जुनून', 'प्यार का साया' यासह अनेक चित्रपट केले, पण त्याला 'आशिकी' प्रमाणे यश मिळू शकले नाही, त्यानंतर तो हळूहळू इंडस्ट्रीतून गायब झाला. राहुल ने बीग बास मध्ये देखील सहभाग घेतला होता पण त्यानंतर तो पुन्हा दिसला नाही.
भाग्यश्री - सलमान खानसोबत आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी भाग्यश्री पहिल्याच 'मैने प्यार किया' सिनेमापासून रातोरात सुपरस्टार बनली. या चित्रपटातील तिची सलमान खानसोबतची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली होती. ती त्या काळातील अभिनेत्रीशी स्पर्धा करेल असा विश्वास होता, पण हे दावे फोल ठरले. आज भाग्यश्री जरी हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी तिच्या 'मैने प्यार किया'ची आठवण कायम आहे.
हरमन बावेजा - २० च्या दशकाबाबत बोलायचे झाले तर असे काही कलाकार आहेत, ज्यांचे स्टारडम त्यांच्या चित्रपटांसमोर फिके पडले आहे. 'लव्ह स्टोरी २०५०' मधून पदार्पण केलेला अभिनेया म्हणजेच हरमन बावेजा. बॉक्स ऑफिसवर त्याच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच हरमन प्रियंका चोप्राचा बॉयफ्रेंड असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. भरपूर प्रसिद्धी मिळवूनही तो इंडस्ट्रीत आपले पाय रोवण्यात अपयशी ठरला. आता तो चित्रपटात अभिनय करण्यापेक्षा चित्रपट निर्मितीकडे वळला आहे.
अमिषा पटेल - अमिषा पटेलने करिअरच्या सुरुवातीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा 'कहो ना प्यार है', 'गदर' हा चित्रपट कोण विसरू शकेल? एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या अमिषाकडून ती इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक असेल अशा अपेक्षा होत्या. मात्र आज ती चित्रपटांमध्ये दिसत नाही. अमिषाकडे अलिकडे काही प्रोजेक्ट्स आले होते पण तेही फ्लॉप ठरले आहेत. सध्या अमिषा पटेल 'गदर २'मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याच्या चर्चा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT