Tata motors
Tata motors esakal
फोटोग्राफी

गाडी घ्यायचा विचार करताय? टाटाच्या या गाड्यांवर मिळतेय भरघोस सूट

सकाळ डिजिटल टीम

टाटांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण त्याची विक्री वाढवण्यासाठी कंपनी ऑगस्ट महिन्यात आपल्या काही निवडक मॉडेल्सवर भरघोस सूट देत आहे. या सवलती रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट लाभांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. कंपनी Tata Harrier, Safari, Tiagoआणि Tigor या मॉडेल्सवर अनेक ऑफर देत आहे.

Tata Harrier वर 45,000 हजार रूपयांची मोठी सुट मिळतेय, यावर एक्सचेंज बोनस आणि 5000 रूपयांचा कॉरपॉरेट सवलत समाविष्ट आहे. ही ऑफर टाटा हैरीयरच्या सगळ्या मॉडेल्सवर देत आहे. ही SUV फक्त 2.0-लिटर 168 bhp डिझेल इंजिनसह मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

टाटा सफारीवर 40,000 हजार चा एक्सचेंज बोनस मिळत आहे. तर या SUV वर कोणतीही कॉर्पोरेट सूट दिली जात नाही. टाटा सफारीने हॅरियरसोबत आपले अधोरेखित केले आहे, परंतु ती 7-सीटर SUV बसण्याची जास्त जागा मिळते. Tata Safari च्या सर्व मॉडेल्सवर एक्सचेंज बोनस दिला जात आहे.
Tata Tiago ही Tata ची भारतीय बाजारपेठेसाठी एंट्री-लेव्हल ऑफर आहे. Tigor प्रमाणेच, कंपनी या कारवर 23,000 रुपयांची सूट देत आहे, ते मॉडेलवर अवलंबून आहे. XE, XM आणि XT मॉडेलवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. XZ ट्रिमवर 10,000 रुपयांची अतिरिक्त रोख सूट दिली जात आहे. यासोबतच सर्व मॉडेलवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे. यामुळे एकूण 23,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
Tata Tigor Tata Tigor वर मॉडेल्सवर नुसार 23,000 रुपयांची सूट मिळत आहे. Tata Tigor XE आणि XM मॉडेल्सवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. XZ व्हेरिएंटवर 10,000 रुपयांची अतिरिक्त रोख सूट मिळत आहे. यासोबतच सर्व मॉडेल्सवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे. जे तुम्हाला एकूण 23,000 रुपयांची सूट देते. ही ऑफर CNG गांड्यांवर ही ऑफर नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT