फोटोग्राफी

मुलींनो तुमच्या पाच सवयी बदला, लग्नासाठी तयार होतील मुलं

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला कोणत्याना कोणत्या गोष्टींचा राग (angery( येत असतो. अनेकांना काही सवयी अजिबात आवडत नाहीत. हेच बघा ना,मुलांच्या (boys)काही सवयी मुलींना (girls)अजिबात आवडत नाहीत. त्याचप्रमाणे मुलींच्या काही सवयी मुलांना अजिबात आवडत नाहीत, अशा मुलींबरोबर ते दूर राहणे पसंत करतात. म्हणूनच मुलींनो जर तुम्हाला या सवयी असतील तर मुलं तुमच्याशी लग्नाचा विचारही करणार नाहीत. किंवा लग्नानंतर या सवयी कळल्या तर तुम्हाला त्या बदलाव्याच लागतील.

दुर्लक्ष करण्याची सवय - काही मुली नेहमीच आपल्या पार्टनरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. मुलांनी त्यांच्या मागेमागे करावे म्हणूनही मुली मुलांकडे दुर्लक्ष करतात. मात्र असा विचार करणे मुलींना जड जाऊ शकते. मुलं अशा मुलींपासून दूर राहणे पसंत करतात. जर तुम्ही पार्टनरबरोबर सतत अशाच वागत असाल तर लवकरच तो तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. इथे तुमचा हेतू कोणता आहे ते मह्चवाचे ठरते. जर तुमच्या इशाऱ्यावर पार्टनरने नाचायचे असा विचार तुम्ही करत असाल, तर तो तुम्हाला सोडण्याचा विचार नक्कीच करू शकतो.
अधिकार गाजवणे- पुरूषांना अतिउत्साही स्वभावाच्या स्त्रिया आवडत नाहीत. त्यांच्यावर खूप अधिकार गाजवणेही त्यांना आवडत नाही. महत्वाचे म्हणजे, पुरुषांमध्ये अहंकार जरा जास्तच असतो आणि तो दुखावायला वेळ लागत नाही. परंतु जेव्हा तुम्ही त्यांना हुकूमत गाजवता तेव्हा त्यांचा स्वाभिमान दुखावतो. जर तुमचा स्वभाव असा असेल तर तुम्हाला तो बदलण्याची गरज आहे नाहीतर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत लग्न करण्याचा विचार करणार नाही.
छोट्या- मोठ्या गोष्टींचा मत्सर करणे - रिलेशनशिपमध्ये एकमेकांचा थोडासाही मत्सर करणे योग्य नसते. पण जर, मर्यादा ओलांडली तर पुरुष अशा स्त्रियांपासून दूर जाणे पसंत करतात. स्त्रियांनीही जास्त मत्सर आवडत नाही. अशा स्थितीत पुरुषही गरजेपेक्षा जास्त सहन करतील अशी अपेक्षा करणे योग्य नाही. त्यामुळे नात्याविषयी जागरुक राहणे महत्त्वाचे आहे, आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवणे यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
स्पेसला धक्का देणे जर एखादी मुलगी बॉयफ्रेंडला सतत त्याच्याबरोबर रहावेसे वाटते म्हणाली तर ते काही काळासाठी चांगले वाटते. पण काही काळानंतर त्याच्या स्पेस संपते. कारण आपल्याला स्वतसाठी थोडासा वेळ मिळावा असे प्रत्येकाला वाटते. अशावेळी नात्यात त्याची घुसमट होते. जर तुम्हाला तुमचे रिलेशन हेल्दी करायचे असेल तर नात्यात एकमेकांची स्पेस जपणे महत्वाचे आहे. पण जर तुम्हाला सतत चिकटून राहणे आवडत असेल तर समोरच्याला त्या गोष्टीचा वैताग येऊ शकतो. अशी सवय असेल तर मुलीनो तुमचे लग्न होण्यात अडचणी येतील.
सवयी सुधारणे - पुरूषाला जोडीदाराच्या सवयी मर्यादेपेक्षा जास्त खटकू लागल्या तर त्याची चिडचिड होते. आपण त्याची काळजी घ्यावी अशी त्याची इच्छा असली तरी प्रत्येक छोट्या गोष्टीत त्रास देणे त्याला आवडत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी कटकट करणाऱ्या मुलींपासून मुलांना दूर राहायला आवडते. जर गर्लफ्रेंड किंवा प्रेयसी म्हणून त्याने तुम्हाला समजून घेतले असले तरी लग्नासाठी तो तुमचा विचार नक्कीच करणार नाही. त्यामुळे मुलींनो तुमच्या सवयी बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT