banana peel
banana peel esakal
फोटोग्राफी

केळीचं साल चुकूनही फेकू नका, फायदे तर जाणून घ्या...

सकाळ डिजिटल टीम

केळं खाणं आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं समजलं जातं. त्यात असलेल्या व्हिटामिन, पॉटेशियम (Potassium) तुमच्या शरीरासाठी (Body) फायद्याचे आहे. ज्याप्रमाणे केळं (Banana) आरोग्यासाठी चांगलं आहे त्याप्रमाणे केळ्याचं सालही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आपण सगळेच केळं खाऊन झाल्यावर त्याचं साल टाकून देतो. पण आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. केळ्यात भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वे आहेत. तर त्याच्या सालीमध्येही व्हिटॅमिन बी ६ आणि बी १२ असते. तसेच तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही साल फायद्याचे आहे. केळ्याच्या सालाचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत, ते समजून घेणे महत्वाचे आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते (Immunity Boost)- रोगप्रतिकारक शक्ती व्हिटॅमिन ए मुळे वाढते. केळ्याच्या सालीत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे साल खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तसेच इंफेक्शनपासून लढण्यास मदत मिळेल. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अनेक गोष्टी खाणे गरजेचे आहे. त्यासाठी केळ्याचे साल खाणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
दातांनाही फायदा (Teeth Care) - दात स्वच्छ करण्यासाठी केळ्याच्या सालाचा वापर करणे, फायद्याचे आहे. दात जर पिवळे पडत असतील तर ते चमकवण्यासाठी या सालांचा उपयोग होऊ शकतो.
उच्च रक्तदाब ( Blood Pressure Care) - ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते त्यांनी केळीचे साल आवर्जून खावे. सालात असलेल्या पॉटेशियममुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत होते
पचनास फायदा (Digestive)- केळ्याच्या सालीत फायबरचे प्रमाण योग्य असते. पोटातल्या अन्नाचे पचन होण्यासाठी फायबर किती प्रमाणात लागते हे तुम्हाला माहिती आहेच. म्हणूनच आहारात केळ्याच्या सालाचा समावेश करणे गरजेचे आहे.
हाडांसाठीही फायदा (Bones Health) - केळ्यासह त्याच्या सालात हाडांसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. थंडीत हाडांच्या अनेक समस्या प्रकर्षाने जाणवतात. अशावेळी केळ्याचे साल खाणे फायद्याचे ठरते.
त्वचा उजळण्यासाठी उपयोग (Skin Care) जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ किंवा फोड येत असतील तर केळ्याचे साल त्यावर घासल्याने आराम मिळतो. सालामुळे तुमची त्वचा उजळते. त्यामुळे स्किन केयरमध्ये तुम्ही केळ्याचे सालही वापरावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT