टोमॅटो 
फोटोग्राफी

टोमॅटो महाग झालेत, या पदार्थांनी वाढवा जेवणाची लज्जत

सकाळ डिजिटल टीम

टोमॅटो सध्या खूप महाग झाले आहेत. 100 ते 120 रूपये किलोने मिळत आहेत. त्यामुळे बजेटचा विचार करता ते न घेणे हे आर्थिकदृष्ट्या सध्या योग्य आहे. तरी रोजच्या जेवणात कुठल्या ना कुठल्या पदार्थात टोमॅटो लागतोच. काही पदार्थांना आंबटपणा येण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. त्यापेक्षा तुम्ही इतर काही पदार्थांचा वापर आंबटपणासाठी करू शकता. असे केल्याने चवही बिघडणार नाही. तसेच तुमच्या बजेटलाही प्रोब्लेम येणार नाही.

दही - ग्रेव्हीला घट्ट आणि आंबटपणा आणण्यासाठी दही हा उत्तम पर्याय आहे. पण दही खूप ताजे आणि आंबट असू नये, याची काळजी घ्या. 1-2 दिवस जुने दही तुम्ही वापरू शकता.
लिंबू- पदार्थाला आंबटपणा येण्यासाठी टोमॅटोच्या एेवजी लिंबू हा पर्याय आहे. आंबटपणा येण्यासाठी ज्या पदार्थात तुम्ही टोमॅटो वापरत होतात त्याएेवजी लिंबू वापरा. थोडी टॅंगी चव हवी असेल तर त्यात साखर मिसळा. आंबट-गोड अशी चव आल्याने पदार्थ चविष्ट होईल.
चिंच- टोमॅटोसारखीच आंबट-गोड चव चिंचेत असते. आमटी- भाजी-सांबारमध्ये तुम्ही चिंचेचा वापर करा. त्यामुळे हे पदार्थ आणखी चविष्ट होतील. प्रथम चिंच पाण्यात भिजवून ती चांगली पिळून घ्यावी. त्याचा रस भाजीत वापरावा.
आमचूर पावडर- पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता. ती अनेक पदार्थात वापरता येते. पदार्थ चविष्ट होण्यासाठी टोमॅटोएेवजी तिचा वापर करू शकता. मात्र 1ते 2 छोटे चमचेच ती वापरावी.
आवळा- जेवणात आंबटपणा आणण्यासाठी आवळा हाचांगला पर्याय आहे. त्यात आंबटपणाबरोबरच थोडी तुरट चवही असते. त्यामुळे आवळा पाण्यात साखरेसोबत भिजत ठेवा. त्यानंतर तो बारीक करून पदार्थांमध्ये वापरता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT