पैसे असलेले लोक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी खर्चाकडे बघत नाही. मध्यमवर्गीय प्रवासी परवडणाऱ्या सहलींचे नियोजन करून प्रवासाचा आनंद घेतात. असे अनेक देश आहेत जिथे भारतीय रुपयाच्या तुलनेत चलन खूपच कमकुवत आहे. म्हणजे रुपयाचे मूल्य त्या देशांच्या चलनापेक्षा जास्त आहे. या देशांच्या सहलीला गेलात तर ठरावीक प्रवासाच्या बजेटमध्ये तुम्ही अधिक आनंद घेऊ शकता.
आइसलँडची गणना जगातील सर्वांत सुंदर ठिकाणांमध्ये केली जाते. येथील नॉर्दर्न लाइट्स, वॉटरफॉल्स, ग्लेशियर्स, द वेस्टफजॉर्ड्स आणि फिलॉजिकल म्युझियममध्ये लोक भेट देतात. येथे भारतीय रुपयाची किंमत १.६५ आइसलँडिक क्रोना आहे.कंबोडिया हा देश अंगकोरवाट मंदिरामुळे जगभर प्रसिद्ध आहे. कंबोडियाचे चलन कंबोडियन रिअल आहे. या देशात भारतीय रुपयाची किंमत ५१.४१ कंबोडियन रिअल आहे. रुपये जास्त असल्याने इतर ठिकाणांपेक्षा इथे जास्त खरेदी करता येते.कंबोडियाच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर येथे कोर थॉम, पोन पोहचा रॉयल पॅलेस, प्रीह मॅनिव्हॉन्ग नॅशनल पार्क, सिसोबाथ कर्वे आदी एकापेक्षा एक पर्यटन स्थळ आहेत.इंडोनेशियाची बेटे खूप सुंदर आहेत. इंडोनेशियामध्ये असलेले बाली हे भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. भारतीय रुपया १९४.२५ इंडोनेशियन रुपयाच्या बरोबरीचा आहे.व्हिएतनाम खूप सुंदर आहे. येथील संस्कृती आणि स्थानिक खाद्यपदार्थ पर्यटकांना खूप आवडतात. येथे भारतीय रुपया ३०८.२२ व्हिएतनामी डोंगच्या बरोबरीचा आहे. म्हणजेच भारतापेक्षा कमी किमतीत तुम्ही खाण्यापिण्यासोबत जास्त गोष्टींचा आनंद घेऊ शकता.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.