"सैराट'मुळे प्रसिद्ध झालेल्या "या' स्थळांना आजही पर्यटक देताहेत भेटी ! Canva
फोटोग्राफी

'सैराट'मुळे प्रसिद्ध झालेल्या 'या' स्थळांना आजही पर्यटक देताहेत भेटी !

"सैराट'मुळे प्रसिद्ध झालेल्या "या' स्थळांना आजही पर्यटक देताहेत भेटी !

अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

"सैराट' चित्रपटाने लोकप्रियतेचे शिखर गाठले व या चित्रपटामुळे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यानेही नावलौकिक मिळवला.

करमाळा (सोलापूर) : "सैराट' चित्रपटाने (Sairat) लोकप्रियतेचे शिखर गाठले व या चित्रपटामुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तालुक्‍यानेही नावलौकिक मिळवला. करमाळ्यापासून पाच किलोमीटर अंतरावरील पोथरे येथे शनी मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर पुरातन व ऐतिहासिक आहे. "सैराट' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण याच परिसरात झाले असून, कमलाभवानी मंदिरातील (Kamlabhavani Temple) 96 पायऱ्यांची विहीर, उजनी धरण (Ujani Dam), देवळाली, चिकलठाण, बिटरगाव (वांगी) येथील परिसर या चित्रपटात दाखवला आहे. त्यामुळे हा परिसर राज्यभरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असून, अनेकजण या परिसराला भेट देऊन "सैराट' चित्रपटांतील दृश्‍यांच्या आठवणीत रमून जातात. पाहूया करमाळा तालुक्‍यातील विविध प्रेक्षणीय स्थळे.

करमाळा येथील 96 पायऱ्यांची विहीर जेथे सैराट चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. करमाळा शहराच्या जवळच कमलाभवानी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम करताना 96 हा आकडा शुभ मानून मंदिराची उभारणी केली आहे, जसे की 96 खांब, येथील 96 पायऱ्यांची विहीर वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक आहे. नवरात्र उत्सवात येथे मोठा उत्सव भरतो. तसेच वर्षभर येथे भाविकांची गर्दी असते.
संगोबा येथील सीना नदीकाठचे आदिनाथ मंदिर.
करमाळा शहराच्या जवळच असलेले कमलाभवानी देवीचे प्रसिद्ध मंदिर. या परिसरात सैराट चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते.
श्री कमलाभवानी देवीची मूर्ती.
श्री कमलाभवानी मंदिरासमोरील डिकमाळ. सैराट चित्रपटात या परिसरातील दृश्‍ये चित्रीत करण्यात आले होते.
श्री कमलाभवानी मंदिरातील आकर्षक कमानीत सैराट चित्रपटातील एका दृश्‍यात आर्ची व परश्‍या.
श्री कमलाभवानी मंदिर परिसरातीलच या निष्पर्णी झाडाचे चित्रीकरण सैराट चित्रपटात करण्यात आले होते. आजही पर्यटक या झाडाला भेट देऊन सेल्फीचा आनंद लुटतात.
सैराट चित्रपटात श्री कमलाभवानी मंदिर परिसरातील डिकमाळावरील एक दृश्‍य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT