सध्या जगभरात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. या संसर्गामुळे जगभरात लाखो लोकांनी आपला जीव गमावला. अनेक राज्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन लागू केला होता, परंतु आता संसर्ग कमी होताच लॉकडाऊनमध्येही शिथिलता देण्यात येत आहे. कोरोना काळातही लोक बस, ट्रेन, विमान इत्यादी प्रवास करत असतात. आवश्यक नसल्यास प्रवास करणे टाळण्याचाच सल्ला सर्वाना दिला जातो. मात्र जर आपल्यासाठी प्रवास करणे खूप महत्वाचे असेल तर काही या काही गोष्टी लक्षात ठेवा.
दुहेरी मास्क वापरा जेव्हा आपण ट्रेनने प्रवास करता तेव्हा विशेष काळजी घ्या प्रावासादरम्यान नेहमी दोन मास्क वापरा. तज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दोन मास्क वापरल्याने 85 टक्क्यांपर्यंत संसर्ग होण्यापासून आपले रक्षण होते.
सोशल डिस्टेंसिंगचे पालन करा ट्रेनमध्ये नियमांचे पालन करण्यासाठी सरकारने ठरवून दिेलेले नियम पाळणे फार महत्वाचे आहे. ट्रेनमध्ये चढताच आपल्या राखीव सीटवर बसा किंवा झोपून जा. शक्य तितक्या लोकांपासून अंतर ठेवा. असे केल्याने आपण आणि आपल्यासोबत प्रवास करणारे इतर नागरिक सुरक्षित राहतील. जेवण घरूनच घेऊन जा संपूर्ण प्रवासादरम्यान आपण बाहेरचे अन्न खाणार नाही याची काळजी घ्या . जर प्रवास लांब असेल तर आपल्याबरोबर जास्तीचे अन्न घेऊन जा. बाहेरचे खाणे सुरक्षित ठरणार नाही. प्रवासादरम्यान, आपल्या सीटवरच बसा आणि कमीतकमी लोकांच्या संपर्कात रहा. काही कोरडे स्नॅक्स नक्की सोबत ठेवा.ट्रेनमध्ये स्वतःचे ब्लँकेट आणि चादर ठेवा प्रवास करण्यापूर्वी, आपण ब्लँकेट्स आपल्याबरोबर घेणे विसरु नक . प्रथम सीट स्वच्छ करा आणि नंतर सीटवर ब्लॅंकेट घाला. जर आपण एसीमध्ये प्रवास करत असाल तर जाड चादरी किंवा ब्लँकेट वापरा.शौचालय वापरताना खबरदारी घ्या जर आपण लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर आपल्याला शौचालय वापरावे लागेल. म्हणूनच, जेव्हा आपण शौचालय वापरता तेव्हा सर्व प्रथम ते वापरण्यापुर्वी व्यवस्थित फ्लश करा. वापरल्यानंतरही फ्लश करणे विसरु नका. असे केल्याने आपण आपली आणि इतरांची सुरक्षेची कळजी घ्याल. त्यानंतर साबणाने आपले हात पूर्णपणे स्वच्छ करा.सीट सॅनिटाईज करा ट्रेनमध्ये प्रवास करताना आपण आपल्याबरोबर एक मोठी सॅनिटायझर बाटली ठेवली पाहिजे. ट्रेनमध्ये येताच प्रथम सॅनिटायझरने आपली सीट स्वच्छ करुन घ्या. सीटवर सॅनिटायझर टाका आणि टिश्यू पेपरने ते स्वच्छ करा. सीट साफ करताना हातमोजे घाला किंवा सॅनिटायझर किंवा साबणाने हात व्यवस्थित स्वच्छ करा .
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.