बिग बॉस मराठी’ सिझन ३ ची धूमधडक्यात सुरवात झाली आहे. कोरोनामुळे गेले 2 वर्ष हा शो सुरु करता आला नाही, त्यामुळे आता प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. तिसऱ्या पर्वामध्ये महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे.
तृप्ती देसाई यांनी शनी मंदिर, शबरीमाला या धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवण्यासाठी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावरही त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले होते. दरम्यान, तृप्ती देसाई यांनी बिगबॉसच्या आवाजाबाबत अडचण व्यक्त केली आहे. तसेच यावेळी त्यांनी हिंदी बिग बॉसमध्ये न जाण्याचे कारण देखील सांगितलेबिगबॉसच्या घरामध्ये तृप्ती देसाई या किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील मीनल शाह आणि सुरेखा कुडची यांच्यासह गप्पा रंगल्या असताना बिगबॉसच्या एक सिझन फक्त महिलांचा हवा अशी चर्चा सुरू झाली. त्यावेळी ‘जर बिग बॉसमध्ये महिला स्पर्धक असत्या तर शो हिट ठरला असता’, असे मत शिवलीला यांनी व्यक्त केले. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी त्यांना हिंदी बिग बॉसची ऑफर मिळाली होती पण मी नकार दिला असे सांगितले. त्याबाबत बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, ''बिग बॉसच आवाज महिलेचा असेल तरच मी येणार असे मी त्यांना तेव्हा सांगितले होते. म्हणून मी हिंदी बिग बॉसमध्ये गेले नाही. पुढच्या कोणत्या सिझनमध्ये तुम्ही बिग बॉसचा आवाज महिलेचा करणार असाल तर मी येते. पण मी आता मराठी बिग बॉसमध्ये आले. मी महिलांसाठी काम करतेना''
तसेच तृप्ती यांनी बिगबॉस यांनी त्यावर त्यांना काय उत्तर दिले हेही सांगितले. बिगबॉसने त्यांच्या मनात असे काही नाही की बिगबॉसचा आवाज महिलेचा असावा की पुरुषाचा'' त्यावर प्रत्यूत्तर देत तृप्ती म्हणाल्या की, पण लोकांच्या मनात असेचे आहे की ऑर्डर देणारा हा पुरुषच असतो, ती महिलाही असायला हवी.’Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.