Dhanashri Kadgaonkar Instagram
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारून अभिनेत्री धनश्री काडगावकर घराघरात पोहोचली. प्रेग्नंसीमुळे धनश्रीने अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला. यादरम्यान तिचं वजन वाढलं होतं. आता बाळंतपणानंतर तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
गरोदरपणानंतर वाढलेलं वजन कमी करणं अनेक महिलांसाठी फार आव्हानात्मक असतं. मात्र धनश्रीने वर्कआऊट आणि डाएटच्या आधारे बरंच वजन कमी केलं आहे. जानेवारी महिन्यात धनश्रीने मुलाला जन्म दिला. कबीर असं तिने तिच्या मुलाचं नाव ठेवलं. या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. धनश्रीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिचं कौतुक केलं आहे. धनश्रीने सोशल मीडियावर तिच्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा पोस्ट केले आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची भूमिका साकारणारी धनश्री अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणाऱ्या नंदिता वहिनी म्हणून तिची घराघरात ओळख झाली. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.