'तुला पाहते रे' या मालिकेत इशा निमकरची भूमिका साकारून अभिनेत्री गायत्री दातार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली.
या मालिकेत गायत्रीने अभिनेता सुबोध भावेसोबत मुख्य भूमिका साकारली होती. मालिकेतील इशा निमकर आणि विक्रांत सरंजामे या दोन व्यक्तीरेखांच्या वयातील अंतर हा चर्चेचा विषय ठरला होता. पहिल्याच मालिकेत गायत्रीने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. मालिकेतील तिचा साधाभोळा अंदाज प्रेक्षकांना आवडला होता. मालिका बंद झाल्यानंतर गायत्री सोशल मीडियावर सक्रिय असून इन्स्टाग्रामवर ती विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. गायत्रीने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून यामधील तिच्या बोल्ड लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. जो आँखों से बयां होते हैं, वो लफ़्ज शायरी में कहाँ होते हैं.. असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला असून अनेकांनी तिला 'परमसुंदरी' असं म्हटलं आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.