Entertainment News: सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींनी चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुरु केले आहेत. त्या (Bollywood Actress) माध्यमातून ते सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यामध्ये बॉलीवूड सेलिब्रेटींसोबतच टीव्ही मनोरंजन विश्वातील (Shehnaz Gill) कलाकारांचा देखील समावेश आहे. बिग बॉसची स्पर्धक आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल सध्या चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं चक्क एका चाहत्यालाच अजब सल्ला दिला आहे.
शहनाजनं तिच्या त्या कार्यक्रमातून चाहत्यांशी खूपच वेगळ्या पद्धतीनं संवाद साधला आहे. त्यामध्ये तिचा वेगळाच अंदाज दिसुन आला आहे. तिनं चाहत्यांना नकारात्मक पद्धतीनं उत्तरं दिलं आहे. एका चाहत्य़ानं शहनाजला 20 रुपयांची पेप्सी असं म्हटलं. तेव्हा त्या कमेंटसनं तिचं लक्ष वेधून घेतले. तिला सेक्सी म्हणूनही संबोधलं. त्यावर दुसरी कमेंट होती लव लाईफ शहनाज....शहनाज गिल त्या चाहत्याला कमेंट करताना शहनाजनं लिहिलं आहे की, तुझ्या तर टि्वटला मी जुमानत नाही. सुरुवातीला अनेकांना असं वाटलं की, शहनाज गंमतीत बोलते आहे. मात्र तसे नव्हते. कारण तिनं यावेळी हसण्याचा इमोजी शेयर केला होता.एकानं ओम शांती ओम फिल्म स्टाईलमध्ये शहनाजला कमेंट करताना एका उत्तराची किंमत तुला काय माहिती शहनाज बाबो, त्यावर शहनाजनं शहनाज बेबी असं म्हटलं आहे. यावेळी एका चाहत्यानं माझी तब्येत बरी नाही म्हणून लिहिलं तेव्हा त्यानं शहनाजला आपली गळाभेट घ्यावी असं आवाहन केलं. त्यावर तिनं तर त्याला माझ्यापासून सहा फूट लांबच राहायचं असा सल्ला दिला. त्या उत्तराची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. तिनं तिच्या आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये आयोजित चाहत्यांशी संवाद साधला. मात्र यामुळे तिनं अनेकांची नाराजी ओढावून घेतली आहे. Tv Actress Shehnaz Gill fans commented ask me anything get trolledRead latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.