पाहा, कार्तिकीसाठी पंढरीत भरली भक्तांची मांदियाळी! Sakal
फोटोग्राफी

Photos : पाहा, कार्तिकीसाठी पंढरीत भरली भक्तांची मांदियाळी!

पाहा, कार्तिकीसाठी पंढरीत भरली भक्तांची मांदियाळी!

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

एसटीचा संप असूनही खासगी वाहने आणि रेल्वेच्या माध्यमातून सुमारे दोन लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. भक्तांच्या मांदियाळीने पंढरपूर भक्‍तिमय झाले आहे.

पंढरपूर (सोलापूर) : एसटीचा संप (St Strike) असूनही खासगी वाहने आणि रेल्वेच्या माध्यमातून सुमारे दोन लाख भाविक पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाले आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद असून मुखदर्शन सुरू आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग कार्तिकी दशमी दिवशी विप्र दत्त घाटापर्यंतच गेली होती. अवघ्या दोन तासात भाविकांना विठुरायाचे मुखदर्शन होत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वीस महिन्यांपासून पंढरपुरात एकही यात्रा भरू शकली नव्हती. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने शासनाने निर्बंध कमी केले. त्यामुळे यंदा जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने नियम पाळत यात्रा भरवण्यास मंजुरी दिली.
यंदा लाखोंच्या संख्येने वारकरी येतील या अंदाजाने प्रशासनाने तयारी केली आहे. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम यात्रेवर झाला आहे. खासगी वाहने आणि रेल्वेतून सुमारे दोन लाख वारकरी दाखल झाले आहेत.
तब्बल वीस महिन्यांनंतर होत असलेली कार्तिकी यात्रा चांगली भरेल आणि चांगली उलाढाल होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. त्यादृष्टीने व्यापाऱ्यांनी तयारी केली.
श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने दर्शनाच्या रांगेसाठी दरवर्षीप्रमाणे तात्पुरत्या पत्राशेड उभा केल्या आहेत. दरवर्षी नवमी दिवशी मंदिर समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पत्राशेड भाविकांच्या गर्दीने भरून जातात. यंदा मात्र नवमी दिवशी पहिल्या क्रमांकाच्या पत्राशेड पर्यंतदेखील रांग जाऊ शकलेली नाही.
वारकऱ्यांच्या दृष्टीने श्री विठ्ठल दर्शनाबरोबरच चंद्रभागेतील स्नानास अनन्यसाधारण महत्व आहे. वारकऱ्यांच्या स्नानाची सोय व्हावी यासाठी शनिवारपासून जुन्या दगडी पुलाजवळील बंधाऱ्यातून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढली असून वारकऱ्यांच्या स्नानाची सोय झाली आहे.
पालिकेने यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये यासाठी प्रदक्षिणा रस्त्यावरील खड्डे बुजवले असून अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
यंदा तुलनेने गर्दी कमी दिसत असली तरीही पोलिस प्रशासनाने नेहमी प्रमाणे पोलिस बंदोबस्त मागवलेला आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT