U19 WC 2022 India most successful team in the history of ICC Under 19 World Cup See Record  sakal
फोटोग्राफी

U19 WC 2022 : टीम इंडियाला विश्व विक्रम भक्कम करण्याची संधी

Kiran Mahanavar

IND vs ENG U19 WC Final : वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या U19 World Cup 2022 ची फायनल आज भारत (India U19) आणि इंग्लंड (England U19) यांच्यात अँटिग्वामध्ये खेळवली जाणार आहे. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. चार वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाचा सामना इंग्लंड विरुद्ध होणार आहे. युवा टीम इंडियाला आपला विश्वविक्रम भक्कम करण्याची संधी आहे. नजर टाकूयात अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीवर...

भारताने आतापर्यंत चार वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. 2000 मध्ये युवा टीम इंडियाने पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. भारतीय संघाने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 8 वर्षानंतर भारत पुन्हा चॅम्पियन झाला. 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 12 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
2012 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता.
त्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडला 2018 मध्ये 8 गडी राखून पराभव केला. चौथ्यांदा युवा संघाने पुन्हा एकदा हे विजेतेपद पटकावले.
मोहम्मद कैफ (2000), विराट कोहली (2008), उन्मुक्त चंद (2012) आणि पृथ्वी शॉ (2018) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हे यश मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: येवला निवडणुकीत छगन भुजबळांचा दबदबा कायम, शिंदेंच्या उमेदवारांना लोळवलं

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT