Ulhasnagar 44 Years Old Bodybuilder Naresh Punjmal Nagdev Selected For Mister World esakal
वयाच्या 23 वर्षापासून कसरत करून मसल्सने बॉडीला आकार देणाऱ्या आणि विविध स्पर्धेत पदके पटकावणाऱ्या उल्हासनगरातील सिंधी बॉडी बिल्डरची वयाच्या 44 व्या वर्षी मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या बॉडी बिल्डरचे नाव नरेश पंजुमल नागदेव आहे. नरेश हा कॅम्प नंबर 5 मधील मस्सल फिटनेस या जिमचा व्यायामपटू आहे. नरेश सध्या 40 वर्षांवरील वयोगटात बॉडीबिल्डिंग करत असून आत्तापर्यंत त्यांनी मास्टर महाराष्ट्र श्री स्पर्धेत सिल्व्हर मेडल, मिस्टर इंडिया स्पर्धेत सिल्व्हर मेडल आणि वेस्टर्न मिस्टर इंडिया स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं आहे.
हिमाचल प्रदेशात झालेल्या मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठीच्या सिलेक्शनमध्ये सहभाग घेतला.
या दोन्ही स्पर्धांसाठी नरेश नागदेव यांची निवड झालीये. मिस्टर एशिया स्पर्धा ही जुलै महिन्यात मालदीवमध्ये,तर मिस्टर वर्ल्ड स्पर्धा डिसेंबरमध्ये थायलंडमध्ये होणार आहे.
नरेशची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेश नेते भारत गंगोत्री, सोनिया धामी यांच्या सोबत अनिल धामेजानी, अमर हिरा, विशाल माखिजा आदींसोबत मस्सल फिटनेस जिम मधील सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं अभिनंदन केले आहे. नरेश पंजुमल नागदेव Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.