फोटोग्राफी

Arun Gawli Photos : अरुण गवळीचं सपत्निक पाडवा सेलिब्रेशन

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याने आज सपत्निक पाडवा साजरा केला. गुढी उभारुन सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

गवळीने सोशल मीडियावर गुढीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्याने ज्ञानेश्वरीतील ओव्यांचं विवेचन केलं आहे.
गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दयेची याचना केली आहे. अरुण गवळीने त्याच्या फुफ्फुस आणि पोटाशी संबंधित आजाराचा उल्लेख केला
अरुण गवळीच्या याचिकेवर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठाने सरकारला नोटीस बजावली आहे.
2007 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्यावर विजय गिरी नावाच्या व्यक्तीने साकीनाका, अंधेरी येथील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडल्या होत्या.
जामसंडेकर यांच्या शत्रूंनी ३० लाख रुपयांची सुपारी दिलेल्या अरुण गवळीच्या सांगण्यावरून जामसंडेकर यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
वास्तविक, जामसंडेकर आणि आरोपींमध्ये जमिनीच्या व्यवहारावरून वाद झाला होता.
अरुण गवळीला आमदार असताना मे 2008 मध्ये या प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर कनिष्ठ न्यायालयाने 2012 मध्ये त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयांचा आदेश कायम ठेवला.
अरुण गवळीने आज मराठी नवीन वर्ष साजरं केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

CISCE Exam Result : आयसीएसईचे ९९.४७ टक्के, तर आयएससीचे ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

SCROLL FOR NEXT