
गोकुळ दूध संघाकडून शौमिका महाडिकांचे आरोप खोडून काढण्यात आले.
esakal
Kolhapur Jilha Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) देशात उच्चांकी १३६ कोटी अंतिम दूध दर फरक देणारा संघ आहे. संघात डिबेंचर योजना नवीन नसून १९९३ पासून राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना संघाने सल्लागारांचे मार्गदर्शन घेऊन, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. दरवर्षी ३१ मार्चला ताळेबंद नफा-तोटा पत्रक तयार करून तो वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला जातो. २०२४–२५ चा ताळेबंद वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाला आहे. त्याची अंमलबजावणी बंधनकारक असल्याची माहिती कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.