valentines day 2022 single people shares memes on social media e sakal
आज प्रेमी युगुलांचा दिवस म्हणजेच व्हलेंटाईन डे आहे. अनेकांनी आपल्या प्रियकर-प्रेयसींवर प्रेम व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत. पण, अशातच सिंगल लोकांनी भन्नाट मिम्स शेअर करत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे, जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. चला तर पाहुयात असेच काही मिम्स.
एका युजरने व्हॅलंटाईन डे चा कंटाळा आल्याची भावना मिम्समधून व्यक्त केली आहे. सिंगल लोकांसाठी व्हॅलेंटाईन वीक नसतो. त्यामुळे त्यांनी ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हे दिवस वगळण्याचा सल्ला सिंगल लोकांना मिम्समधून दिला आहे. एकाने म्हटलंय, #SayNoToValentinesDay हा कदाचित एकमेव हॅशटॅग ट्रेंड करत आहे ज्याला मी सपोर्ट करते. एका सिंगल व्यक्तीने चित्रपटगृहातील फोटो शेअर करत व्हॅलेंटाईन डे ला तो कसा एकटा असतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गुगल पे मध्ये 'Better Luck Next Time' असं दाखवत असते. त्याचाच वापर करत मिम्स बनवलंय आणि त्यावरून माझा व्हॅलेंटाईन डे नेहमीच असा असतो हे सांगण्याचा प्रयत्न त्या मिमर्सने केला आहे. प्रेमीयुगुल व्हॅलेंनटाईन डे ला रोमान्स करत असतील तर आम्ही त्यांना त्रास देऊ, असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.