Vande Bharat Express esakal
फोटोग्राफी

Vande Bharat Express : सोलापूर-शिर्डी ला धावणाऱ्या वंदे भारतचा स्पीड किती ?

वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून उदघाटन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सीएसएमटी ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान सेमी हाय स्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून उदघाटन केले आहे.

या उदघाटन कार्यक्रमासाठी सीएसएमटी स्थानक सज्ज झाले होते. आजपासून सर्वसामान्य प्रवाशांना वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे तिकीट आरक्षित करतात येणार आहे.
रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून देशभरात वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल्या आहे. सध्या आठ मार्गावर सेमी हाय स्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस धावत आहे. प्रथमच मुंबई ते सोलापूर आणि मुंबई आणि साईनगर शिर्डी दरम्यान घाटातुन धावणाऱ्या या पहिल्याच वंदे भारत रेल्वे गाड्या असणार आहे.
या गाडीची ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असली तरी सर्वसाधारण मार्गावर १००-१२० किमी तर घाट परिसरात ताशी ५५ किमी वेगाने चालवण्यात येणार आहे.
या गाडीला लोकल ट्रेनच्या तुलनेत तिपटीहून अधिक क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटार लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाडीला ३६०० हॉर्स पॉवर एवढी ताकद मिळणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT