Vastu Tips For Home esakal
फोटोग्राफी

Vastu Tips For Home: या पाच सोप्या उपायांनी होईल वास्तु दोष दूर, घरात येणार आनंदी आनंद

तुम्ही काही सोपे उपाय केलेत तर तुमच्या घरातील वास्तु दोष दूर होऊ शकतो. जाणून घ्या उपाय.

सकाळ डिजिटल टीम

सुखी आणि समृद्ध जीवनासाठी वास्तु शास्त्राचे उपाय फायदेकारक ठरत असतात. तुमच्या घरातील महत्वाच्या गोष्टी वास्तु शास्त्रानुसार असेल तर तुमच्या घरात सकारात्मक उर्जेचा संचार होईल. मात्र काही गोष्टी वास्तुशास्त्रानुसार नसल्यानेही घरात नकारात्मक उर्जा वास करते. अशावेळी तुम्ही काही सोपे उपाय केलेत तर तुमच्या घरातील वास्तु दोष दूर होऊ शकतो. जाणून घ्या उपाय.

वास्तु शास्त्रानुसार घरात जुन्या, तुटक्या फुटक्या आणि अनावश्यक वस्तू तुमच्या घरात नकारात्मकता निर्माण करत असतात. देवघराचं स्थान योग्य योग्य जागी असावं. मनाची शांती आणि घराच्या चौमुखी विकासासाठी पूजा घराचं स्थान उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य कोणात असायला हवं. याचं कारण असं की ते देवी देवतांचं स्थान असतं. तुमच्या देवघराची जागा कधीही टॉयलेट, किचन किंवा पायऱ्यांजवळ नसावी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या.
घराच्या आत असलेले कोळी, धूळ वेळोवेळी स्वच्छ करत राहावे. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. जर तुम्ही तुमच्या घरी झाडं लावली असतील तर वेळोवेळी त्यांनी पाणी देत राहा. कुठलं रोपटं वाळलं असेल तर तिथून बाजूला करावं.
घरचा दरवाजा उघडताना किंवा बंद करताना जर का विचित्र आवाज येत असतील तर लगेच ते दुरूस्त करून घ्या.
वास्तु शास्त्रानुसार कधीही दक्षिण दिशेला तोंड करून झोपू नये. असं करणं अशुभ मानलं जातं. याव्यतिरीक्त विश्रांतीगृहात मुख्य दाराकडे पाय करूनही झोपू नये.
पूर्व दिशेला डोकं किंवा पश्चिम दिशेकडे पाय करून झोपल्याने आध्यात्मिक भावनेत वाढ होते. तसेच घरात काटेरी झाडे लावू नका. वास्तु शास्त्रानुसार यामुळे घरात नकारात्मकता निर्माण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: अमेरिका-इराण युद्ध केवळ पाच सेकंदात संपू शकतं; जागतिक वित्तीय संस्था 'जेफरीज'चा खळबळजनक दावा

Farmer loan waiver Maharashtra : शेतकरी कर्जमाफी आचारसंहितेत अडकणार का? पूर्वतयारी अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांनी गुपीत फोडलं

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणात महिलेला अटक

Dog Bite Crisis: माळेगावात पिसाळलेल्या श्वानाचा हैदोस; सात नागरिक जखमी, दोन वृद्ध महिलांना नांदेडला हलविले

Kannad MIDC Delay: कन्नड एमआयडीसी नऊ वर्षे रखडली; आत्मचिंतनाची गरज असल्याचा उदय सामंतांचा टोला

SCROLL FOR NEXT