Viral Photos esakal
फोटोग्राफी

Viral Photos : कडेवर बसून निघाली नवरदेवाची वरात, अडीच फूटाचा नवरा अन् तीन फूटाची नवरी

हापुडा इथल्या तीन फूट उंची असणाऱ्या बुशारा सोबत मोठं गाजतवाजत त्याचं लग्न झालं. कडेवरून निघालेल्या या नवरदेवाला बघायला परिसरातल्या लोकांनी गर्दी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशच्या शामली गावातील अडीच फूटचा अजीम अंसारी याची नवरदेव बनण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. हापुडा इथल्या तीन फूट उंची असणाऱ्या बुशारा सोबत मोठं गाजतवाजत त्याचं लग्न झालं. कडेवरून निघालेल्या या नवरदेवाला बघायला परिसरातल्या लोकांनी गर्दी केली होती.

अजीम बऱ्याच काळापासून लग्नासंबंधीत चिंतेत होता. यासाठी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि परिसरातल्या एसएचओ यांनासुध्दा त्याने नवरी शोधण्यासाठी विनंती केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच अजीम रातोरात सोशल मीडियावर हिरो बनला. आणि त्याला देशभरातून स्थळं येऊ लागली.
जेव्हा अजीमची वरात निघणार होती तेंव्हा त्याच्या वडिलांनी त्याला कडेवर घेतलं. त्याने नातेवाईक आणि शेजाऱ्यांना सांगितलं की, आज मी माझ्या बेगमला घ्यायला जात आहे. अल्लाहने माझं ऐकलं. शेरवानी घालून ते कारमध्ये बसले. लग्नाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
अजीमने क्रीम कलरची शेरवानी आणि पायजमा घातला होता. तर लाल रंगाच्या लेहंग्यात नवरी बुशाराचं रूप खुललं होतं. धामधूमीत हे लग्न झालं. दोघांचा आनंद चेहऱ्यावरून व्यक्त होत होता. २९ वर्षीय अजीमची वरात जशी बुशाराच्या दारात पोहचली तशी पाहणाऱ्यांची तिथं गर्दी जमली. लोकांनी नवदांपत्याला भरपूर शुभाशीर्वाद दिले. लग्नाला आलेल्या अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली.
अजीमचे वडिल आणि नातेवाईकसुध्दा त्याच्या लग्नाने फार खूश आहेत. ते अजीमच्या लग्नासंदर्भात फार खूश होते. शेवटी त्याची प्रार्थना फळाला आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT