Virat Kohli luxurious Lifestyle Wealth And Income Sources With Car Collection esakal
फोटोग्राफी

Virat Kohli : रन मशीन कोहली पैसे छापण्यातही आहे 'किंग', संपत्तीचे आकडे पाहून डोळे फरतील!

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Net Wealth Lifestyle Income and Luxury Cars : विराट कोहलीने नुकतेच आपला धावांचा दुष्टाळ संपवून आपल्या रन मशीनचे उत्पादन जोमाने सुरू केले आहे. तीन वर्षापासून विराट कोहलीच्या धावांचा ओघ अटला होता. मात्र आशिया कपपासून त्याने पुन्हा धावांची आमि विक्रमांचा पाऊस पाडण्या सुरूवात केली. दरम्यान, 5 नोव्हेंबरला विराट आपला 34 वा वाढदिवस साजरा करतोय. विराट कोहली धावांप्रमाणे पैसा कमावण्यातही आघाडीवर आहे. एकवेळ त्याच्या धावांचा घोघ कमी होईल. मात्र पैशाचा ओघ कमी होणार नाही.

विराट कोहलीकडे आहे 1046 कोटी रूपयांची संपत्ती : mpl.live ने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीची एकूण संपत्ती 1046 कोटी रूपयांच्या जवळपास आहे. विराट कोहली वर्षाला 15 कोटी तर महिन्याला जवळपास 1 कोटी 25 लाख रूपये कमवतोय. गणित केलं तर विराट एका दिवसाता 5 लाख 76 हजार 923 रूपये कमवतोय.
BCCI किती कोटी देते? : विराट कोहली हा भारतीय संघातील एक महत्वाचा सदस्य आहे. त्यामुळे तो बीसीसीआयच्या ग्रेड A मध्ये समविष्ट आहे. केंद्रीय करारानुसार त्याला वर्षाला 7 कोटी रूपये मिळतात. विराट कोहली आयपीएलमधूनही वर्षाला कोट्यावधी रूपये कमवतोय. विशेष म्हणजे यात मॅच फी समाविष्ट नाही. त्याचे वेगळे पैसे त्याला मिळतात.
सोशल मीडिया ही उत्पन्नाचे साधन : विराट कोहलीचे सोशल मीडियावर जबरदस्त फॉलोअर्स आहेत. तो आपल्या या फॅन फॉलोईंगचा वापर विविध कंपन्यांच्या ब्रँडिंगसाठी करतो. यातून देखील त्याची मोठी कमाई होते. विराटने अनेक कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. यातून त्याला चांगला परतावा मिळतो.
जाहिरात, गुंतवणूक आणि रेस्तराँ विराट कोहली मान्यवर, एमपीएल, पेस्सी, फिलिप्स, फास्टट्रॅक, बूस्ट, ऑडी, एमआरएफ, हिलो, वॉल्वोलिन, प्युमा यासरख्या अनेक ब्रँडची जाहिरात करतो. यातून देखील त्याला बक्कळ पैसा मिळतो. तर विराट कोहलीने Blue Tribe, Chisel Fitness, Nueva, Galactus Funware Technology Pvt. Ltd, Sport Convo, Digit यासरख्या कंपन्यांमध्ये देखील आपली गुंतवणूक केली आहे. याचबरोबर विराट कोहली 'वन8 कम्यून' नावाची रेस्तराँ चेन देखील चालवतो.
इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये देखील विराट : विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 220 मिलियन फॉलोअर्स आहेत. तो सर्वात फेमस सेलेब्रिटीच्या यादीत समाविष्ट आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार इन्स्टावरील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंमध्ये मेस्सी आणि रोनाल्डोनंतर विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. कोहली आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी जवळपास 8.9 कोटी रूपये आकारतो. HQ 2022 इंस्टाग्राम रिच लिस्ट नुसार टॉप 20 च्या यादीत भारताची अभिनेत्री प्रियांका चोप्रानंतर विराट कोहली एकटा आशियाई व्यक्ती आहे.
लक्झरी गाड्यांचा शौकीन विराट विराट कोहलीला महागड्या गाड्यांची फार मोठी हौस आहे. विराट कोहलीकडे सहा लक्झरी कार आहेत. यात Audi Q7 (70 ते 80 लाख), Audi RS5 (जवळपास 1.1 कोटी), Audi R8 LMX ( 2.97 कोटी), Audi A8L W12 Quattro (1.98 कोटी), Land Rover Vogue (2.26 कोटी) या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT