कार्तिकी एकादशीनिमित्त आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजले विठ्ठल मंदिर Sakal
फोटोग्राफी

'कार्तिकी'निमित्त आकर्षक फुलांनी-विद्युत रोषणाईने सजले विठ्ठल मंदिर

कार्तिकी एकादशीनिमित्त आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजले विठ्ठल मंदिर

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने कार्तिकी यात्रा (प्रबोधिनी भागवत एकादशी) निमित्त श्री विठ्ठल व रुक्‍मिणीमातेचा गाभारा, श्री नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभामंडप व श्री रुक्‍मिणीमाता सभामंडप येथे आकर्षक व मनमोहक अशी रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच मंदिराला मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

कार्तिकी एकादशी पूजेच्या वेळी विठुराया निळ्या रंगाचा बनारसी अंगरखा, पितांबर, शेला अशा पोषाखात सावळ्या विठुरायाचे राजस सुकुमाराचे रूप खुलून दिसून आले.
श्री रुक्‍मिणी मातेला हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसवण्यात आली.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पुणे येथील श्री विठ्ठलभक्त राम जांभुळकर यांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली होती.
आजच्या सजावटीसाठी झेंडू, आष्टर, शेवंती, जरबेरा, गुलाब, कामिनी, गुलछडी, तगर अशा विविध प्रकारच्या सुमारे पाच टन रंगीबेरंगी आकर्षक फुलांचा वापर करण्यात आला.
मंदिरात सभामंडप, सोळखांबी, 'श्रीं'चा गाभारा, श्री रुक्‍मिणी मातेचा गाभारा, श्री रुक्‍मिणी माता सभामंडप, मंदिरातील परिवार देवता अशा सर्व ठिकाणी फुलांनी सजावट करण्यात आलेली असल्याने जिकडे पाहावे तिकडे फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळत आहे.
श्री. जांभुळकर हे गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी फुलांची सजावट करत आहेत.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT