Who is Yash Dayal | IPL 2022 Gujarat Titans  sakal
फोटोग्राफी

यश दयालचा करिअरमधील पहिल्याच सामन्यात जलवा; वडिलांनी दिली होती कोचिंग

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात नवीन खेळाडूंनी बराच धुमाकूळ घातला आहे.

Kiran Mahanavar

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात नवीन खेळाडूंनी बराच धुमाकूळ घातला आहे. टिळक वर्मा, आयुष बडोनी, अभिनव मनोहर, वैभव अरोरा यांसारख्या स्टार्सनी त्यांच्या डेब्यू सीझनमध्येच धमाल केली आहे. आता या यादीत गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयालचे नावही जोडले गेले आहे.(Who is Yash Dayal | IPL 2022)

डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच यशने शानदार गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या.
यश दयाल यांचा जन्म 13 डिसेंबर 1997 रोजी प्रयागराज येथे झाला. यश दयाल यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो भारतीय संघाच्या बायो-बबलचा भाग होता.
वडिलांची स्वप्ने पूर्ण व्हावीत म्हणून यश दयाल यांनी वयाच्या ८ व्या वर्षापासून क्रिकेटमध्ये करिअरला सुरवात केली. यश दयाळ यांचे वडील देखील सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाजी करत होते, परंतु गरीब कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांची क्रिकेट कारकीर्द थांबवण्यात आले होते.
IPL 2022 च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने 3.2 कोटी रुपयांना विकत घेतले. लिलावात यशची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांनीही त्याला खरेदी करण्यात रस दाखवला होता.
24 वर्षीय यश दयालने सप्टेंबर 2018 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये यूपीसाठी लिस्ट-अ मध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी रणजी करंडकातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर यश दयाल फेब्रुवारी 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे यूपीसाठी टी-20 पदार्पण करण्यात यशस्वी झाला.
यशने 16 टी-20 सामन्यांमध्ये 20.66 च्या सरासरीने 18 बळी घेतले आहेत. 14 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 23 बळी घेतले आहेत. प्रथम श्रेणी सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर या गोलंदाजाने 14 सामन्यांमध्ये 29.04 च्या सरासरीने 50 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT