सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपासून एक गाणं तुफान व्हायरल होत आहे. इन्स्टा युजर्स या गाण्यावर आता रिल्स देखील बनवत आहेत. Manike Mage Hithe हे गाणं तुम्ही गेल्या कित्येक दिवसांमध्ये वारंवार ऐकले असेल. यामध्ये एक तरुणी हे गाण गाताना दिसत असून ही तरुणी कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे
Manike Mage Hithe हे गाणे ज्या मुलीने गायले तिचे नाव आहे योहानी. केवळ इन्स्टाग्रामवर नव्हे तर तर फेसबुक ट्वीटरसह सगळीकडे याच गाण्याची चर्चा सूरू असून युट्यूबरही हे गाणे ट्रेंडीगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.योहानीच्या या गाण्याने इतक वेड लावलं आहे की, चक्क बॉलीवूड सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन यांनाही व्हिडीओ बनविण्याचा मोह आवरला नाही.
योहानीचे व्हिडीओ पाहता ही दाक्षिणात्य असेल आणि तिने गायलेले हे गाणे तमिळ किंवा मल्याळम भाषेत असे सर्वांना वाटत होते पण ती मुळची श्रीलंकेची असून हे गाणे सिंहली भाषेत आहे.योहानीचे पूर्ण नाव योहानी दिलोका डिसिल्वा असे असून तिचा जन्म ३० जुलै १९९३ मध्ये श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झाला. २०१६ साली योहानीने युट्यूबर म्हणून करिअर सुरु केले. योहानीला श्रीलंकेत 'रॅप प्रिन्सेस' म्हणून ओळखले जाते.योहानी शाळेत असताना चांगली स्विमर आणि पोलो खेळाडू होती. त्यानंतर पुढील शिक्षण तिने इंग्लंडला जाऊन पूर्ण केले. लॉजिस्टिक मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल अकाउंटिंगची पदवी घेतली, मात्र त्यानंतर तिने संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
Manike Mage Hithe हे गाणे तामिळ आणि मल्याळम भाषेतही डब करण्यात आले आहे. २६ जुलैला या गाण्याचे व्हर्जन प्रदर्शित करण्यात आले. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.