Why these actresses are unmarried ? esakal
फोटोग्राफी

या अभिनेत्री का अजूनही अविवाहित ? प्रसिद्धी शिखरावर तरी लाईफ पार्टनर नको ?

या अभिनेत्रींचे लग्न न करण्याचे उघड कारण जरी आपल्यापुढे या अभिनेत्रींनी सांगितले नसले तरी त्यांच्या अविवाहित असण्याची वेगवेगळी कारणं आपल्यापुढे येत असतात.

सकाळ ऑनलाईन टीम

नवनवीन बॉलीवुड चित्रपटांसह प्रेक्षकांना बॉलीवुडमधल्या प्रसिद्ध कलाकारांचे वयक्तिक आयुष्य जाणून घेण्यात कायमच उत्सुकता असते.अगदी ८० च्या दशकापासून कलाकारांच्या प्रेम कथा बॉलीवुडमधे गाजल्या आहेत.मात्र याच पार्श्वभूमीवर अनेक अभिनेत्री आजही अविवाहित आहेत.या अभिनेत्रींचे लग्न न करण्याचे उघड कारण जरी आपल्यापुढे या अभिनेत्रींनी सांगितले नसले तरी त्यांच्या अविवाहित असण्याची वेगवेगळी कारणं आपल्यापुढे येत असतात.

यामधे पहिलं चर्चित नाव म्हणजे रेखा.तिच्या अभिनयाने आणि सौदर्याने चाहत्यांपासून ते सेटवरील अभिनेत्यांपर्यंत सगळे रेखावर फिदा असायचे.मात्र या सुंदरीने अजूनही लग्न का केले नाही असा प्रश्न कायम चाहत्यांना पडतो.यावर आजपर्यंत अनेक अफवाही उडाल्यात आणि चर्चाही झाल्यात.आजही रेखाच्या अविवाहित असण्यामागचं कारण असंच मानलं जातं की,रेखाने अमिताभला लग्नाविषयी विचारले होते.पण त्यावेळी अमिताभ जयाला सोडायला तयार नव्हता.आणि याच कारणाने रेखाच्या आयुष्याचं वळणच बदललं.६७ वर्षाची रेखा आजही तेवढीच सुंदर दिसते.मात्र तिने आजही लग्न केलेले नाही.
तब्बू देखील आजपर्यंत अविवाहित असण्याचं एक खास कारण मानलं जातं.तब्बूचं नागार्जून या अभिनेत्यावर प्रेम होतं.खरं तर नागार्जूनने जेव्हा तब्बूला डेट करायला सुरूवात केली तेव्हा त्याचं लग्न झालं होतं.पण प्रेमात वेडे दोघेही दहा वर्ष सोबत होते.दहा वर्ष डेट केल्यानंतर मात्र तब्बूच्या एक गोष्ट लक्षात आली की नागार्जून काहीही झालं तरी त्याच्या पत्नीला सोडणार नाही.त्यामुळे माघार घेत तब्बूने त्याच्याशी ब्रेक अप केलं.त्यानंतर तब्बूने कोणाशीच लग्नाचा विचारही केला नाही.
अमिषा पटेलची लव स्टोरी निराळीच.'आप मुझे अच्छे लगने लगे' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अमिषा चित्रपट दिर्गदर्शक विक्रम भट याला डेट करत होती.पाच वर्षाच्या डेटिंगनंतर २००८ मधे या दोघांचं ब्रेक अप झालं.तेव्हापासून आजपर्यंत अमिषा अविवाहित आहे.
आश्रम फेम ईषा गुप्ता सध्या सोशल मीडियामधे भारी चर्चेत असते.तिचंही अजून लग्न झालेलं नाही.पण मात्र लॉकडाऊनपासून ईषा मॅन्यूल (Manuel Campos Guallar) या स्पॅनिश बिजनेस मॅनला डेट करत असण्याची चर्चा सुरू आहे.
थप्पड अभिनेत्री तापसी पन्नू मॅथिस बोई नावाच्या बॅडमिंटन प्लेयर आणि कोचला डेट करत असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या.मात्र अलिकडेच तिने एका मुलाखतीत एक मोठं विधान केलंय.ती म्हणते,'जो मुलगा माझ्या पालकांना नको असेल त्याच्याशी मी लग्न करणार नाही.'तापसी पन्नू अजूनही अविवाहित आहे.मात्र तिने लवकऱ्यात लवकर आता लग्न करावे असा तिच्या पालकांचा हट्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT