फोटोग्राफी

'या' महत्वाच्या गोष्टी तुम्हाला ठेवतील हृदयाच्या आजारांपासून दूर

स्नेहल कदम

आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना हृदयाचा आजार उद्भवू शकतो. जगभरात अनेकांचे वेगवेगळ्या आजाराने मृत्यू होतात. हाय ब्लड प्रेशर, वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. कामाचा तणाव, वेळीअवेळी बदललेल्या जेवण पद्धती यामुळे अनेकांना त्रास होत असतो. काही लोकांना अनुवशिंकतेमुळेही हृदयाच्या काही आजारांचा त्रास होऊ शकतो. काही लोक आपल्या सवयींमुळे या आजाराला निमंत्रण देतात. परंतु काही गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष केंद्रीत केल्यास तु्म्ही या आजाराचे तुमच्या शरीरातील प्रमाण कमी करु शकता.

फायबर असलेला डाएट - काही संशोधनातून बऱ्याच वेळा पालेभाजी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरात फायबरचे प्रमाण अधिक वाढते. एका संशोधनामधून फुल डेअरी उत्पादकांमध्ये कोलेस्ट्रोल अधिक असते. हे कोलेस्ट्रोल कमी करण्याचे काम भाज्यांतील फायबर करतात.
वजनावर लक्ष केंद्रीत करा - वजन जास्त असणे हे हृदयासाठी योग्य नाही. यामुळे डायबिटीजचा त्रासही उद्भवू शकतो. तज्ज्ञांच्या मतानुसार वजन कमी करण्यास सुरुवात केली की आपोआप शरीरातील अनेक गोष्टी ठीक होतात. वजन कमी केल्याने ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते.
दररोज व्यायाम - तंदुरुस्त राहिल्याने हृदयाच्या आजारातही सुधारणा सुरु होतात. व्यायामामुळे ब्लड प्रेशर सुधारते, वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी होते. याशिवाय तणाव कमी करण्याचे कामही ते करते.
न्यट्रीशिअन लेबल चेक करा घातक आजारांपासून हृदयाला दूर ठेवायचे असल्यास सोडिअम, साखर या गोष्टींपासून दूर रहा. या साऱ्या गोष्टी कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे काही गोष्टी खरेदी करत असताना त्यांची लेबल चेक करुन घ्या.
पुरेशी झोप घ्या पुरेशी झोप न मिळणे किंवा झोप पूर्ण न होणे हे शरीरासाठी अपायकारक आहे. यामुळे हार्ट फ्लिअर किंवा स्लीप डिसरऑर्डरचा धोका वाढतो. स्लीप डिसरऑर्डरमुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण वाढते जे हृदयाच्या आजारांना वाढवू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT