World Students' Day 2022 esakal
फोटोग्राफी

World Students' Day 2022: विद्यार्थ्यांसह पालकांनीही एकदा पहाच ‘हे’ चित्रपट

विद्यार्थी आणि पालकांच्या जीवनावर आधारित आहेत चित्रपट

सकाळ डिजिटल टीम

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस संयुक्त राष्ट्रांकडून जागतिक विद्यार्थी दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून प्रसिद्ध आहेत. कलाम जी आपल्या ज्ञान, शिक्षण आणि भाषणातून नेहमी विद्यार्थ्यांशी जोडले गेले होते त्यामूळे ते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान होते. असेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी संबधित काही चित्रपट...  

ब्लॅक: ब्लॅक हा 2005 चा इंग्रजी आणि हिंदी भाषेतील चित्रपट आहे. जो संजय लीला भन्साळी यांनी सह-लिखित, दिग्दर्शित आणि सह-निर्मित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत असून, आयशा कपूर , शेरनाझ पटेल आणि धृतिमान चॅटर्जी सहाय्यक भूमिकेत आहेत.चित्रपटाचे कथानक साधे पण प्रभावी आहे. हा चित्रपट बहिऱ्या आणि आंधळ्या असलेल्या मिशेल नावाच्या मुलीच्या आयुष्याभोवती फिरते. तिच्या जीवनात येणारी आव्हाने आणि तिच्या या प्रवासात तिच्यासोबत देबराज हा शिक्षक आहे.
तारे जमीन पर: हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. दिग्दर्शक म्हणून आमिर खानचा हा पहिलाच चित्रपट होता. ह्या चित्रपटामध्ये आठ वर्षांच्या इशानची गोष्ट रंगवली आहे.त्याला डिस्लेक्सिया हा आजार असतो.असलेल्या एका मुलाची काल्पनिक कथा रंगवली आहे. तो अभ्यासात हुशार नसल्याने त्याच्या पालकांकडूनत त्याला हिनवले जाते.तेव्हा एक कला शिक्षक, त्याला त्याच्यातील क्षमता ओळखण्यास मदत करतो.
3 इडियट्स : 3 इडियट्स हा एक 2009 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात आमिर खान, आर. माधवन, शर्मान जोशी, करीना कपूर, बोम्मन इराणी, ओमी वैद्य,मोना सिंग आणि परिक्षीत साहनी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील मैत्री त्याचबरोबर अभ्यास आणि तरुणांवर असलेलं करियरचं ओझं, त्यात घुसमटलेला विद्यार्थी यांचे वर्णन केले आहे. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दाखवण्याचा प्रर्यंत्न या चित्रपटाच्या माध्यामातुन दाखवण्यात आला आहे.
सुपर ३०: सुपर ३० हा 2019 मधील बायोग्राफिकल चित्रपट आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाचे साजिद नाडियाडवाला यांनी निर्मिती आहे. हा चित्रपट गणिताचे शिक्षक आनंद कुमार आणि "सुपर ३०" नावाच्या शैक्षणिक कार्यक्रमाच्या जीवनाविषयी आहे. ज्यांना आपल्या 30 विद्यार्थ्यांनी आयआयटी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे अशी आशा आहे. यात मुख्य भूमिकेत हृतिक रोशन, मृणाल ठाकूर, वीरेंद्र सक्सेना, पंकज त्रिपाठी, आदित्य श्रीवास्तव आणि अमित साध यांची आहेत.
अंग्रेजी मिडियम: २०२० साली प्रदर्शित झालेला होमी अदजानिया दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्स या प्रोडक्शन बॅनरखाली निर्मित चित्रपट आहे. यात . 2017 मध्ये आलेल्या हिंदी मीडियम या चित्रपटाचा आध्यात्मिक सिक्वेल या चित्रपटात दिवंगत इरफान खान , राधिका मदान , दीपक डोबरियाल आणि करीना कपूर खान यांच्या भूमिका आहेत. यात परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न असलेल्या मुलीचे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या कुटुंबाचे प्रर्यंन्त दाखविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT