फोटोग्राफी

Year Ender 2022: वर्ष २०२२ मध्ये 'या' कोट्यावधी रुपयांच्या गाड्या भारतात झाल्या लाँच, फीचर्स अफलातून; पाहा किंमत

सकाळ डिजिटल टीम

वर्ष २०२२ संपलायला अवघे काही दिवस बाकी आहेत. यावर्षात भारतीय बाजारात एकापेक्षा एक शानदार कोट्यावधी रुपये किंमतीच्या कार लाँच झाल्या आहेत. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, फरारी, एस्टॉ मार्टिन, लॅम्बॉर्गिनी सारख्या कंपन्यांनी भारतीय बाजारात महागड्या कार्स लाँच केल्या आहेत. २०२२ मध्ये भारतात लाँच झालेल्या या कारविषयी सविस्तर जाणून घेऊया.

जानेवारी महिन्यात लँड रोव्हरने रेंज रोव्हर २०२२ ला भारतात लाँच केले होते. लाँचवेळी या कारची एक्स-शोरुम किंमत २.३१ कोटी रुपये आहे.
फेब्रुवारी महिन्यात लाँच झालेल्या BMW M4 Competition Coupe 50 Jahre M Editionची एक्स-शोरुम किंमत १.४४ कोटी रुपये आहे.
मर्सिडीजने मेबॅक एस क्लास ५८० फोर मॅटिकला मार्च महिन्यात भारतात लाँच केले होते. कारची किंमत २.५ कोटी रुपये आहे.
मर्सिडीजने मेबॅक एस क्लास ६८० फोर मॅटिकला ३.२ कोटी रुपयात भारतात लाँच केले आहे.
रेंज रोव्हरने स्पोर्ट एसयूव्हीला मे महिन्यात लाँच केले होते. या कारची एक्स-शोरुम किंमत १.६४ कोटी रुपये आहे.
पोर्श 911जीटी3 आरएसची एक्स-शोरुम किंमत ३.२४ कोटी रुपये आहे.
मर्सिडीजने ईक्यूएस ५८० ला ऑगस्ट महिन्यात भारतात लाँच केले होते. या कारची एक्स-शोरुम किंमत १.५५ कोटी रुपये आहे.
फेरारीने २९६ जीटीबीला ऑगस्ट महिन्यात भारतात लाँच केले होते. या कारची एक्स-शोरुम किंमत तब्बल ५.४० कोटी रुपये आहे.
एस्टॉन मार्टिनने डीबीएक्स ७०७ ला भारतीय बाजारात ऑक्टोबर महिन्यात लाँच केले होते. या कारची किंमत ४.६३ कोटी रुपये आहे.
नोव्हेंबर महिन्यात लाँच झालेल्या Lamborghini Urus Performante ची एक्स-शोरुम किंमत ४.२२ कोटी रुपये आहे.
काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Lamborghini ऑफ रोडिंग सुपरकार Huracán Sterrato ला तुम्ही ४.६१ कोटी रुपयात खरेदी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT