kokani food sakal
फोटोग्राफी

येवा कोंकण आपलोच आसा...

कोकणातील रूचकर पदार्थ..

तेजस भागवत

कोकण .... निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघायचा असेल तर प्रत्येकाने एकदा तरी कोकणाला भेट दिलीच पाहिजे. निळाशार समुद्र , नारळी पोफळीच्या बागा त्यासोबतच रुचकर असे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल कोकणात पाहायला मिळते. आंबा , काजू नारळ आणि मासे तर कोकणाची प्रमुख ओळख हे. सामाजिक , आर्थिक , राजकीय आणि सांस्कृतिक यांसारख्या अनेक विविधतेने नटलेले हे कोकण म्हणजे पृथीवरचा स्वर्ग आहे जणू स्वर्ग ... येवा कोंकण आपलोच आसा...

कोकणातील ग्रामीण भागात हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे. कोकणी माणसाची न्याहारी या पदार्थानेच सुरु होत असते. यात मिठाच्या घावन आणि गोडात घावण घाटले, सात कप्याचे घावण, गुळाची खापरोळी असे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.
श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर सापडणारच नाही. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे. अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. भाजीचं अळू आणि वडीचं अळू अशी साधारण वर्गवारी भाजीवाले करतात.
हॉटेल गणेश कृपा हे संगमेश्वर मधील प्रसिद्ध हॉटेल असून, इथे रुचकर , स्वादिष्ट असे नारळाचे मोदकासाठीच प्रसिद्ध आहे. या मध्ये सफरचंद , आंबा , चॉकलेट आणि किवी व इतर अनेक चवींचे रुचकर असेल नारळाचे मोदक मिळतात .
फणसाचे सांदण हा पदार्थ कोकण व गोव्यात हा पदार्थ लोकप्रिय असून कापा किंवा बरका फणसाचे सांदण केले जाते. कोकणात सांदण वाफवतात तर गोव्यात धोंडस भाजतात म्हणजे बेक करतात
सोलकढी हे कोकम आणि नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. कोकम आणि नारळामधील आरोग्यदायी गुणधर्म स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात मांसाहारासारखे पचायला जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढी पिणं नक्कीच फायदेशीर ठरते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT