National Park
National Park sakal
फोटोग्राफी

1 जुलैच्या आधीच कुटुंबासह फिरायला जा, या सहा पैकी एका राष्ट्रीय उद्यानांमध्ये…

सकाळ डिजिटल टीम

1 जुलैच्या आधी तुम्ही कुटुंबासह या 6 राष्ट्रीय उद्यानांमध्ये जाऊ शकता, कारण ही उद्याने पावसाळ्यात बंद होतात.दरवर्षी पावसाळा जवळ आला की, भारतातील बहुतेक राष्ट्रीय उद्याने चार ते पाच महिने बंद असतात. पण आपल्याला थोडा जरी पाऊस पडला, आजुबाजूला जरा हिरवळ झाली की बाहेर फिरायला जायची इच्छा होते मग अशावेळी जर तुम्हाला जून महिण्यात एखाद्या राष्ट्रीय उद्यानाला भेट दयायची असेल, तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या उद्यानांपैकी एखादे उद्यानाला भेट देऊ शकता.

आता आम्ही तुम्हाला अशा उद्यानांबद्दल सांगणार आहोत, जेथे पावसाळ्यापूर्वी कुटुंबासह फिरायला जाऊ शकता.

6) ताडोबा राष्ट्रीय उद्यान, महाराष्ट्र ताडोबा राष्ट्रीय उद्यान 30 जून ते 15 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. मात्र, येथील बफर झोन वर्षभर उघडे राहतात. जर तुम्ही पक्षीप्रेमी असाल तर तुम्हाला जंगल सफारी करताना काही रहिवासी प्रजाती असणारे पक्षी देखील इथं पाहायला मिळतील. आणि हो वाघोबा पाहण्यासाठी देखील ताडोबा हे एक चांगले ठिकाण आहे.
1) रणथंभोर राष्ट्रीय उद्यान रणथंभोर राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प 30 जूनपासून बंद राहणार आहेत. पण निराश होण्याची बिलकुल गरज नाही कारण 1 ऑक्टोबरपासून तुम्ही या उद्यानाला पुन्हा भेट देऊ शकता. तुमच्याकडे जर आता वेळ असल्यास तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह 30 जून पूर्वी येथे जाण्याचा विचार करू शकता. सर्व कोअर झोन सध्या बंद असले तरी बफर झोन आणि गेट 6 ते10 या वेळेत खुले राहतील. तुम्ही जर पक्षीप्रेमी असल्यास काही ऑफ-सीझन पक्षी तुम्हाला बफर झोनमध्ये पाहायला मिळतील.
3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाप्रमाणे मानस देखील दरवर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पर्यटनसाठी बंद असते. मानसमध्ये देखील अतिवृष्टी आणि पुराची समस्या काझीरंगासारखीच आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की इथला प्रवेश बंद होतो.
4) कान्हा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश हे उद्यान आता सध्या पर्यटनासाठी खुले असले तरी 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत ते पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. पावसाळ्यात पाण्यामुळे या ठिकाणच्या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होते. त्यामुळे पर्यटकांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो. म्हणून पावसाळ्यात इथं पर्यटनासाठी जाता येतं नाही.
5) बांधवगड राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश बांधवगड राष्ट्रीय उद्यानही 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. सर्व कोअर झोन जरी बंद असले तरी, तुम्ही पानपथ, जोहिला आणि धामोखरच्या बफर झोनमध्ये फिरू शकता. हे झोन वर्षभर खुले असतात, पण पावसाळ्यात इथल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असते.
2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान , आसाम काझीरंगा हे भारतीय गेंड्यांकरता प्रसिद्ध असलेले उद्यान आहे. परंतु ते आता पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. 1 मे ते 1 ऑक्टोबर या कालावधीत उद्यान बंद असते. या उद्यानात लोकांसाठी हत्ती आणि जीप सफारी उपक्रम आहेत. ज्यांच्यात बसून लोक राष्ट्रीय उद्यान सफारीचा आनंद घेऊ शकतात. आसाममध्ये पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे उद्यान आणि आसपासच्या भागात पाण्याची पातळीत वाढ होते. त्यामुळे येथे पक्षी सुद्धा पाहणे कठीण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT